शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे, परबांच्या निकटवर्तीयांविरोधात दुसऱ्या दिवशी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 10:15 IST

प्राप्तिकर विभागाकडून जप्त कागदपत्रांद्वारे चौकशी. प्राप्तिकर विभागाने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी छापेमारी करत झाडाझडती सुरू केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निकटवर्तीयांविरोधात सलग दुसऱ्या दिवशी प्राप्तिकर विभागाची छापेमारी सुरूच होती. झाडाझडतीमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांद्वारेही पथक अधिक तपास करत आहे. 

प्राप्तिकर विभागाने आदित्य ठाकरे  यांचे निकटवर्तीय उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी छापेमारी करत झाडाझडती सुरू केली होती. या कारवाईत प्राप्तिकर खात्याने कनाल यांची १५ तासांहून अधिक चौकशी केली. मध्यरात्रीच्या सुमारास पथक त्यांच्या घरातून बाहेर पडले. यादरम्यान जप्त कागदपत्रांद्वारे पथक अधिक तपास करत आहे. 

दुसरीकडे बुधवारीही त्यांचे सर्च ऑपरेशन सुरु होते. यामध्ये, कनाल यांच्यासोबतच अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले संजय कदम यांच्या अंधेरीतील कैलास नगरमध्ये असलेल्या स्वान लेक या इमारतीतील घरी, तसेच पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी बजरंग खरमाटे यांचे घर आणि मालमत्तांवर सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती सुरु आहे. प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईदरम्यान  दस्तऐवज, कागदपत्र, डिजिटल पुरावे ताब्यात घेत त्याआधारे आर्थिक व्यवहारांची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. 

तसेच अनिल परब यांचे लेखापरीक्षक (सीए) असलेल्या व्ही. एस. परब असोसिएटस यांचे घर आणि कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही प्राप्तिकर खात्याचे अधिकारी ठाण मांडून बसले असल्याची माहिती मिळते. येथूनही काही महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आला आहे. मुंबईत १२हून अधिक ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरु आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग