शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांशी भांडण झाल्याने आयकर अधिकाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 16:03 IST

मुंबईत आयकर विभागात निरीक्षक म्हणून काम करतात मुलाचे वडील 

 

नवी मुंबई - वाशीच्या खाडीत मंगळवारी एका १४ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. हा मृतदेह वाशी खाडीच्या काठावर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तरुणाच्या अंगावरील शाळेच्या गणवेषावरून वडिलांनी मुलाला ओळखले असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. हा मुलगा नेरुळ येथील अपेज्जी शाळेत बारावीत शिकत होता. वडिलांशी भांडण करून शाळेत गेलेला हा तरुण घरी न परतल्याने वडिलांनी नेरुळ पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याबाबत तक्रार नोंद केली होती. 

वडाळ्यातील अँटॉप हिल येथे राहणाऱ्या या तरुणाने वडिलांशी भांडण करून वाशीच्या खाडीत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. १९ जुलैला एक तरुण हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती.  अपेज्जी शाळेत बारावी शिकणारा हा तरुण १९ जुलै रोजी दुपारी शाळेतून निघाला आणि त्याने रिक्षा पकडली. त्याच्या शाळेतील मित्राने दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा नेहमी लोकलने प्रवास करायचा. पण नेमकं त्या दिवशी त्याने रिक्षा पकडली. शिवाय तो कोणत्यातरी विचारात होता. एरव्ही सुद्धा कमी बोलायची सवय असल्यामुळे तो त्यादिवशी अस्वस्थ का आहे ते विचारले नाही, ही माहिती त्याच्या मित्राने दिली. त्या मित्राने त्याला शेवटचे पाहिले त्यानंतर त्याला कोणीही पाहिले नाही. तो घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदवली. २४ जुलैला वाशी खाडी परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना एक मृतदेह सापडला. मृतदेहावरील शाळेचा गणवेशावरुन या मुलाची ओळख पटली असल्याची माहिती देशमुख दिली आहे. 

मृत मुलाचे वडिलांशी काही कारणावरुन भांडण झाले होते. त्याने वडिलांना मेसेज करुन मी घरी येणार नाही. घरातल्यांची काळजी घ्या, असे मेसेजमध्ये म्हटले होते. पोलिसांना या मेसेजचे लोकेशन वाशी खाडी असल्याचे कळाले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. मुलाचे वडिल आयकर विभागात अधिकारी असल्यामुळे अपहरणाच्या दृष्टिने देखील हा तपास केला जात होता. पण मंगळवारी या तरुणाचा मृतदेह सापडला आणि या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबईSuicideआत्महत्या