शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

संमोहित करत महिलेनं अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं; त्यानंतर शारिरीक संबंध बनवले,मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 08:50 IST

पीडित मुलाला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले असून आरोपी महिलेला अडीच महिन्यांनी अटक केली आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे एका महिलेने अल्पवयीन मुलासोबत बळजबरीनं लैंगिक संबंध बनवले. या महिलेने मुलाचं अपहरण केले त्यानंतर त्याच्यासोबत संबंध बनवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची सुटका करून आरोपी महिलेला अटक केली आहे. तिच्यावर पॉक्सो अंतर्गत तसेच विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची आणखी चौकशी केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रकूटच्या राजापूर भागातून महिलेने तिच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचं आधी अपहरण केले होते. त्यानंतर या अल्पवयीन मुलासोबत जबरदस्तीनं शारिरिक संबंध बनवले. सुरुवातीला मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार घेऊन मुलाचे नातेवाईक राजापूर पोलीस ठाण्यात पोहचले तेव्हा पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर कुटुंबाने कोर्टाकडे धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर राजापूर पोलिसांनी १ ऑक्टोबर २०२२ रोजी या प्रकरणात गुन्हा नोंदवला. 

या प्रकरणाचा तपास करणारे उपनिरिक्षक सूबेदार बिंद यांनी सांगितले की, आम्ही तपासातंर्गत अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यावेळी राजापूर पोलिसांना १० ऑक्टोबर २०२२ रोजी अपहरण झालेला मुलगा प्रयागराज जिल्ह्यात सापडला. पोलिसांनी या मुलाची पडताळणी केली तेव्हा तो १७ वर्षांचा असल्याचा आढळला. 

संमोहित करून महिला घेऊन गेली - पीडित मुलगापोलिसांनी या प्रकरणी कलम ३७६ चाही समावेश केला. महिलेद्वारे लैंगिक शोषणाचा शिकार झालेल्या पीडित मुलाने पोलिसांना सांगितले की, महिलेने मला संमोहित करून तिच्यासोबत घेऊन गेली होती. त्याठिकाणी माझ्यासोबत बळजबरीनं शारिरीक संबंध बनवले. मुलाच्या जबाबानंतर पोलिसांनी महिलेवर कारवाई केली. पीडित मुलाला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले असून आरोपी महिलेला अडीच महिन्यांनी अटक केली आहे.