शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:02 IST

मुख्याध्यापिकेला अटक, मुख्याध्यापिकेने केलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल काही विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यावर बुधवारी सकाळी पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुख्याध्यापिकेला जाब विचारला.

शहापूर : एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आणि पॅड आढळल्याने संतप्त झालेल्या मुख्याध्यापिकेने पाळी आलेल्या विद्यार्थिनीला शोधण्यासाठी अनेक विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे काढून तपासणी केली होती. या घृणास्पद प्रकाराबद्दल पोलिसांनी बुधवारी मुख्याध्यापिकेसह चार शिक्षिका, महिला सफाई कामगार आणि दोन संस्थाचालकावर पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. तर, मुख्याध्यापिका आणि सफाई कामगार महिलेला अटकही करण्यात आली आहे.

शाळेच्या महिला सफाई कामगाराला मंगळवारी दुपारी स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आणि भिंतीवर रक्ताने माखलेल्या बोटांचे ठसे आढळल्याने तिने हा प्रकार मुख्याध्यापिकेच्या निदर्शनास आणला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थिनींना बोलावून कोणाला पाळी आली आहे का? असे दरडावून विचारले. मात्र अनेक विद्यार्थिनी भीतीने गप्प बसल्या. त्यावर मुख्याध्यापिकेने पुन्हा संतापून विचारताच काही विद्यार्थिनींनी घाबरून पाळी आल्याचे सांगितले. परंतु, त्यांच्यावर विश्वास न ठेवता मुख्याध्यापिकेने सफाई कामगार महिलेस सर्व विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे काढून तपासणी करण्यास सांगितले. तसेच भिंतीवरील रक्ताच्या डागाची चित्रफीतही प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थिनींना दाखवली. शिवाय, काही विद्यार्थिनींच्या बोटांचे ठसेही घेतल्याचा आरोप पोलिसांत दाखल तक्रारीत करण्यात आला आहे.

पालकांची शाळेत धाव, विचारला जाबमुख्याध्यापिकेने केलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल काही विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यावर बुधवारी सकाळी पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुख्याध्यापिकेला जाब विचारला. संस्थाचालक येईपर्यंत पालकांनी शाळेतच ठिय्या दिला. पालक मुख्याध्यापिकेविरोधात प्रचंड संताप व्यक्त करीत असतानाच पोलिस पोहोचले आणि त्यांनी तातडीने मुख्याध्यापिकेला पोलिस ठाण्यात आणले.

संतप्त पालकांचा जमाव पोलिस ठाण्यात पोलिसांनी मुख्याध्यापिकेस पोलिस ठाण्यात नेल्यानंतर संतप्त पालकांनी आपला मोर्चा पोलिस ठाण्याकडे वळवला. जोपर्यंत संस्थाचालक शहापूरला येत नाही आणि मुख्याध्यापिकेवर कारवाई करत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असे म्हणत पालकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडले.

संस्थाचालकांसह चार  शिक्षिकांना पोक्सोया प्रकाराबद्दल दोन संस्थाचालक, मुख्याध्यापिका, चार शिक्षिका आणि सफाई कामगार महिलेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपपोलिस अधीक्षक मिलिंद शिंदे यांनी सांगितले. संस्थेना मुख्याध्यापिकेला बडतर्फ करणार असल्याची माहितीही त्यांनी पालकांना दिली.

टॅग्स :Schoolशाळा