शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पत्नी अन् लेकीची दिवसाढवळ्या रस्त्यावर डोक्यात गोळी झाडून हत्या; स्वत:लाही संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:03 IST

भररस्त्यात पत्नी, मुलीच्या डोक्यात झाडली गोळी; त्यानंतर स्वत:लादेखील संपवलं

पाटणा: बिहारची राजधानी पाटण्यामध्ये दुहेरी हत्याकांड घडलं आहे. भररस्त्यात घटस्फोटित पत्नी आणि मुलीला संपवल्यानंतर व्यक्तीनं स्वत:वर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. अनीसाबाद पोलीस वसाहतीत ही घटना घडली. घटस्फोटित पत्नी आणि मुलीच्या डोक्यात गोळ्या झाडल्यानंतर व्यक्तीनं स्वत:लाही संपवलं. 

घटनेची माहिती मिळताच पाटण्याचे एसएसपी पथकासह घटनास्थळी पोहोचले. दुपारी पाऊणच्या सुमारास ही घटना घडल्याचं एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लो यांनी सांगितलं. गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचं नाव राजीव कुमार आहे. राजीव कुमारच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यानं मेहुणी शशीप्रभासोबत विवाह केला.राजीवला पहिल्या पत्नीपासून संस्कृती नावाची मुलगी आहे. दुसऱ्या पत्नीनं राजीवला घटस्फोट दिला. संस्कृतीला राजीवसोबत राहायचं नव्हतं. त्यामुळे राजीव वैतागला होता. घरगुती वादातूनच राजीवनं शशीप्रभा आणि संस्कृतीला संपवल्याचं पोलिसांनी सांगितलं.

गुरुवारी दुपारच्या सुमारास राजीवनं भररस्त्यात शशीप्रभा आणि संस्कृतीवर गोळीबार केला. राजीवनं झाडलेल्या गोळ्या दोघांच्या डोक्याला लागल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघी ठार झाल्याचं पाहून राजीवनं स्वत:वरही गोळी झाडली. आता पोलीस राजीवच्या सासूची चौकशी करत आहेत. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्नदेखील सुरू आहे.