शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, पेल्हार पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 17:14 IST

पेल्हार गावातील कोहिनूर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या जैद नजीर शेरशिया (२३) यांच्या घरी २० सप्टेंबरला सकाळी आठच्या सुमारास चोरी झाली होती.

- मंगेश कराळे

नालासोपारा :  घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ११ गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेल्या रोख रकमेपैकी ५ लाख १२ हजार ७०० रुपये हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.

पेल्हार गावातील कोहिनूर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या जैद नजीर शेरशिया (२३) यांच्या घरी २० सप्टेंबरला सकाळी आठच्या सुमारास चोरी झाली होती. चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करत कपाटातील १० लाख १५ हजाराची रोख रक्कम चोरी करून नेली होती. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी तपास गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्याकडे देऊन वेगवेगळे ५ पथके तयार करून आरोपींना अटक करून गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेश केले होते.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अमंलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळाच्या परिसरातील सुमारे ६० वेगवेगळया ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासुन आरोपीला निष्पन्न केले. आरोपी बाबतीत माहिती प्राप्त करून आरोपी हा भिवंडी येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. आरोपी भिवंडी, अंबाडी पारोळ, नालासोपारा फाटा, शानबार हॉटेल, धानिवबाग असा पाठलाग करुन आरोपी चंद्रकांन्त रवि लोखंडे ऊर्फ चंदु (२६) यास शानबार हॉटेलच्या जवळ, धानिवबाग येथुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केल्यावर त्याचा गुन्हयात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर अटक केले आहे.

आरोपीकडे तपास केल्यावर गुन्हयात चोरी केलेल्या रोख रक्कमेपैकी ५ लाख १२ हजार ७०० रुपये हस्तगत केले आहे. अटक आरोपीकडून पेल्हारचे ८, वालीवचे २, मांडवीचा १ असे ११ गुन्ह्यांची उकल केली आहे. अटक आरोपीकडून उघडकीस आलेल्या चोरी/घरफोडीच्या ११ गुन्हयामध्ये  रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने व मोबाईल असा ८ लाख ९९ हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरुध्द वालीव व तुळींज पोलीस ठाण्यात पूर्वी १० गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शिवानंद देवकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, संजय मासाळ, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, दिपक शेळके, नामदेव ढोणे, सोहेल शेख यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी