शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बंद खोलीत आढळले ५ मृतदेह; शेजाऱ्यांनी सांगितले धक्कादायक कारण, ऐकून सर्वच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 11:01 IST

मृत मनोज घरातूनच किराणा दुकान चालवत होता. रविवारी सकाळी एक शेजारी दूध खरेदी करण्यासाठी दुकानावर आला होता मात्र दुकान बंद होते.

बुरहानपूर - मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात रविवारी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे जी ऐकून सर्वच हैराण झाले. एका खोलीत पोलिसांना ५ मृतदेह सापडले. पत्नी आणि ३ अल्पवयीन मुलीची हत्या करून पतीने स्वत: गळफास घेत आयुष्य संपवले. नेपानगरच्या डवालीखुर्द गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. 

पोलीस अधीक्षक राहुल कुमार लोढा यांनी सांगितले की, ३५ वर्षीय मनोजने ३२ वर्षीय पत्नी साधना, ३ मुली, त्यात १० वर्षीय अप्सरा, ८ वर्षीय नेहा आणि ३ वर्षीय तन्नूची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत फासावर लटकला. मनोजचं मानसिक संतुलन बिघडले होते त्याचमुळे त्याने हे कृत्य केले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना आढळली नाही असं त्यांनी म्हटलं. दूध खरेदीला आलेल्या ग्राहकाने पाहिलं... 

मृत मनोज घरातूनच किराणा दुकान चालवत होता. रविवारी सकाळी एक शेजारी दूध खरेदी करण्यासाठी दुकानावर आला होता मात्र दुकान बंद होते. शेजाऱ्याने दरवाजा वाजवला, २-३ ग्राहक दुकानाजवळ आले होते. आवाज दिला तरीही घरातून काहीच आवाज बाहेर ऐकायला आला नाही. काही लोकांनी मनोजच्या मोबाईलवर कॉल केला परंतु तो वाजतच राहिला. जेव्हा लोकांनी घरातील खिडकी तोडून खोलीत पाहिले तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वच हैराण झाले. मनोजचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत होता तर त्याच खोलीत पत्नी आणि मुलींचा मृतदेह जमिनीवर पडला होता. 

शेजाऱ्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. सकाळी ९.३० वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट नाही. परंतु मृतदेह पाहून शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचा अंदाज लावला जात आहे. मनोजच्या शेजाऱ्यांनी म्हटलं की, काही दिवसांपासून मनोजची पत्नी आणि मुले आजारी होती. उपचारानंतरही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. ज्यामुळे मनोजचा स्वभाव चिडचिडा झाला होता. ते घरात किराणा दुकान चालवायचे. तीन मुली शाळेत शिक्षण घ्यायच्या. आजारी असल्याने त्या शाळेत जात नव्हत्या असं सांगण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी