शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना लग्न करायचं होतं, पण घरचे तयार नव्हते; अखेर प्रेमी युगुलानं संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 15:07 IST

घटनास्थळी पोलिसांना सिंदूर आणि मिठाईचा बॉक्स सापडला. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला, श्वास गुदमरल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ इथं एका प्रेमी युगुलानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रियकरानं आधी प्रेयसीच्या कपाळावर सिंदूर लावले मग मिठाई खायला दिली. त्यानंतर एका रस्सीनेच गळफास घेत आत्महत्या केली. या दोघांच्या नात्याला घरच्यांनी नकार दिला होता असं पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्याठिकाणी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवले. सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय राखी आणि उत्तराखंडच्या हरिद्वार येथे राहणाऱ्या २४ वर्षीय मनिषचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर प्राथमिक तपासात राखी-मनिष एकमेकांवर प्रेम करत होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. परंतु घरच्यांनी दोघांच्या नात्याला नकार दिला. गेल्या काही दिवसांपासून राखी-मनिष तणावात होते. रविवारी रात्री मनिष आणि राखी भेटले. त्यावेळी मनिषने राखीच्या कपाळावर सिंदूर लावले. दोघांनी मिठाई खाल्ली आणि त्यानंतर टोकाचे पाऊल उचलले. दोघेही एकाच रस्सीच्या सहाय्याने एकमेकांना पकडून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. 

तसेच घटनास्थळी पोलिसांना सिंदूर आणि मिठाईचा बॉक्स सापडला. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला, श्वास गुदमरल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दोघांचा मृत्यू एकाचवेळी झाला. युवक आणि युवतीच्या मृतदेहांवर नातेवाईकांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. 

दरम्यान, याचप्रकारच्या एका घटनेत एका २० वर्षीय युवतीने प्रियकरासोबत कालव्यात उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. मुलीला स्थानिक लोकांनी वाचवले तर अद्याप युवकाचा शोध लागला नाही. मुलीची अवस्था गंभीर आहे. त्यामुळेच अद्याप तिचा जबाब नोंदवला नाही. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते.या प्रकरणातही घरच्यांनी दोघांच्या नात्याला नकार दिला म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी