शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी हट्ट करणाऱ्या प्रेयसीला संतापलेल्या प्रियकरानं लाथांनी मारलं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 10:14 IST

या व्हिडिओत आरोपी प्रियकर मुलीच्या अंगावर लाथा मारताना दिसत आहे. त्याने लाथ मारून तिच्या चेहऱ्याला दुखापत केली.

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका तरुणीला तिच्या प्रियकराने बेदम मारहाण केली. ही तरुणी त्या तरुणाकडे लग्नासाठी हट्ट करत होती. या गोष्टीचा तिच्या प्रियकराला राग आला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाण झालेल्या युवतीचं वय १९ वर्षे आहे.

बुधवारी झालेल्या कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं. पीटीआयच्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मऊगंज भागातील रहिवासी आहे. युवती आणि आरोपी युवकामध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्यात वाद झाला, त्यानंतर आरोपी प्रियकरानं मुलीला बेदम मारहाण केली. व्हिडिओमध्ये मुलगी तिच्या प्रियकराकडे लग्नासाठी हट्ट करत होती. मुलीच्या हट्टामुळे आरोपी प्रियकराचा संताप अनावर होतो आणि तो  चिडतो. त्यानंतर प्रेयसीच्या केसांना पकडून तो जमिनीवर फेकतो आणि मारहाण करतो असं उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीओपी) नवीन दुबे यांनी सांगितले. 

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलया व्हिडिओत आरोपी प्रियकर मुलीच्या अंगावर लाथा मारताना दिसत आहे. त्याने लाथ मारून तिच्या चेहऱ्याला दुखापत केली. तो मुलीवर अत्याचार करतानाही दिसतो. त्याच वेळी, मुलीला मारहाण केल्यानंतर, तो तिला पुन्हा जमिनीवरून उचलतो. मात्र मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसते.

प्रेयसी रुग्णालयात दाखलमुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. या घटनेबाबत मुलगी आणि तिच्या कुटुंबियांकडून माहिती गोळा करण्यात आली आहे. प्रकरण प्रेमसंबंधाचे आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले आणि त्यानंतर सोडून दिले. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी आरोपींविरुद्ध आणखी कलमे लावत गुन्हा नोंद केला आहे.