शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत युवकाचा खून; धारधार शस्त्राने केले वार, पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 10:08 IST

काही दिवसांपूर्वी मित्रांबरोबर वाद झाला होता. या वादातूनच या तरुणावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

इचलकरंजी : येथील तीन बत्ती चौकात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाचा खून झाला. राहुल बाबू दियालू (वय 22) असे त्याचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून एका कामगाराच्या मुलाचा धारधार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दयाळ हा आपल्या कुटुंबियांसमवेत तीन बत्ती चौका नजीक राहत होता. त्याचा काही दिवसांपूर्वी मित्रांबरोबर वाद झाला होता. या वादातूनच राहुल याच्यावर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास चाकूसारख्या धारदार शास्त्राने वार करून मारेकरी पळाले. रक्तबंबाळ झालेल्या राहुलला उपचारासाठी आयजीएम रुग्णालय दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. किरकोळ कारणातून त्याचा खून केला असल्याचे समजते.

याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह दोघा संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख करीत आहेत.  दरम्यान, आयजीएम रुग्णालय परिसरात मृताचे नातेवाईक व मित्र यांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीichalkaranji-acइचलकरंजी