शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गँगस्टरशी विवाह्यबाह्य संबंध; विष पिऊन पत्नीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 09:45 IST

गुजरातमध्ये एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीने विष पिऊन आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. 

अहमदाबाद - गुजरातच्या एका ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीनं शनिवारी विष प्यायलं. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना गांधीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रविवारी उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. यावेळी तपासात अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आले आहेत. 

माहितीनुसार, IAS अधिकारी आणि त्यांची पत्नी गेल्या अनेक महिन्यांपासून वेगळे राहत होते. अधिकाऱ्याची पत्नी तामिळनाडूत राहणारी होती जी एका गँगस्टर हायकोर्ट महाराजाच्या संबंधात आली. इतकेच नाही तर तामिळनाडूत १४ वर्षीय मुलाच्या अपहरणात तिचं नाव आलं होतं. गँगस्टरनं त्याचा साथीदार सँथिल कुमारसह ११ जुलैला मुलाचं अपहरण केले होते. मुलाच्या सुटकेसाठी २ कोटीची खंडणी मागितली. पोलिसांनी या मुलाची सुटका केली तेव्हापासून पोलीस आयएएस पत्नी सूर्याचा शोध घेत होती. 

जवळपास ९ महिन्यापूर्वी सूर्याने आयएएस पतीला सोडलं होतं. ती गँगस्टरच्या प्रेमात होती. ८ महिन्यापासून ती गुजरातला नव्हती. अधिकाऱ्याने पत्नीला घटस्फोट देण्याचं ठरवलं होतं. तेव्हा पत्नी पतीच्या घरी आली तेव्हा तिला घरात  घुसण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर महिलेनं विष प्यायलं, गांधीनगरच्या रुग्णालयात उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी पत्नी सूर्याने पत्र लिहिलं होतं. सूर्याबेनच्या मृत्यूची बातमी पोलिसांनी तिच्या कुटुंबाला दिली. 

आत्महत्येपूर्वी सूर्याबेननं एक पत्र लिहिलं होतं. त्यात तिने तामिळनाडूत झालेल्या विश्वासघाताचा उल्लेख केला होता. त्यांना नवीन आयुष्य सुरू करायचं होतं परंतु काहीठिकाणी त्यांचे पैसे अडकले होते जे परत मिळण्याची शक्यता नव्हती. पतीकडेही ती जाऊ शकत नव्हती. पत्रात महिलेने पतीविरोधात कुठलेही आरोप लावले नाहीत. ज्येष्ठ आयएएस अधिकारी रंजीत कुमार २००५ चे बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या गुजरात विद्युत नियामक आयोगाच्या सचिव पदावर कार्यरत आहेत. दिर्घकाळापासून हे दोघे पती-पत्नी विभक्त राहत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी