शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

नातीनेच रचला आजोबांच्या हत्येचा कट; सुपारी देऊन फ्लाईटनं गाठलं पुणे, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 10:44 IST

संपत्ती, मालमत्तेसाठी नातीनं आजोबांना कायमचं संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.

गोंडा - उत्तर प्रदेशातील गोंडा येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी संपत्तीच्या लालसेपोटी ७८ वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. हत्येची सुपारी देऊन मुख्य आरोपी एक दिवस आधीच फ्लाईटनं पुण्याला पोहचली होती. मृत व्यक्ती रेल्वेचे निवृत्त कर्मचारी होते. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत मास्टरमाईंड नातीसह ३ जणांना अटक केली आहे.

माहितीनुसार, मनकापूर परिसरातील भरेऊ गावातील ही घटना आहे. २० जुलैला गावातील ७८ वर्षीय वृद्धाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आणि तपासासाठी ३ पथके नेमण्यात आली. तपासात समोर आलेल्या माहितीतून ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली. जेव्हा या तिघांची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा या हत्येमागील मुख्य सूत्रधार मृत व्यक्तीची नात रिंकी चौहान होती. 

तपासात तिने पोलिसांना सांगितले की, आजोबांना मारण्यासाठी सलमान आणि अखिलेशला प्लॅनमध्ये सहभागी केले. ज्यांनी ही हत्या घडवून आणली. सध्या पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे. मृत आजोबांची मालमत्ता अनेक ठिकाणी होती. रिंकी चौहानला ४ भाऊ आणि एक बहीण आहे. काही वर्षांपूर्वी रिंकी आजोबांसोबत राहत होती. जेव्हा आजीचं निधन झालं तेव्हा आजोबांसोबत नातं बिघडलं. आजोबा फार कडक होते. शिवीगाळ करायचे. आजोबांनी हळूहळू त्यांच्या संपत्तीतील काही भाग त्यांच्या नातसूनेच्या नावे केला होता. ते तिला आणखी संपत्ती देणार होते. काही वर्षापासून त्यांची सेवा नातसूनेनेच केली. आजोबांची सर्व संपत्ती तिलाच मिळेल असं वाटत होतं हे रिंकींच्या तपासातून पुढे आले.

संपत्तीच्या कारणामुळेच आजोबांना हटवण्याचं प्लॅनिंग आखलं. सलमान आणि अखिलेशला काही पैशांचे लालच दिले. त्यानंतर १९ जुलैला रात्री हत्येची तयारी केली. रिंकी स्वत: १८ जुलैला विमानानं पुण्याला निघून गेली. रिंकीने तिचा मित्र दिनेशला सांगून सलमान आणि अखिलेशला १९ जुलैच्या रात्री गावात पोहचायला सांगितले. दिनेशनं यो दाघांना रिंकींचे आजोबा बटेश्वरी चौहान यांच्या घरी पाठवलं. त्याठिकाणी या दोघांनी वृद्ध व्यक्तीचा गळा दाबला. त्यानंतर कुऱ्हाडीने गळ्यावर आणि पाठीत वार केले. सध्या या प्रकरणी पोलिसांनी मास्टरमाईंड रिंकी चौहान आणि सलमान, अखिलेश या  आरोपींना अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी