शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये पुन्हा दिवसाढवळ्या गोळीबार, तीन दिवसातील दुसरी धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 20:17 IST

Firing Case : विरार पूर्वेकडील बरफपाडा येथे आसाराम राठोड (५०) या कंत्राटदारावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे.

नालासोपारा : विरारमध्ये पुन्हा दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाल्याने विरारमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विरार पूर्वेकडील बरफपाडा येथे आसाराम राठोड (५०) या कंत्राटदारावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात कंत्राटदार राठोड जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विरारच्या संजीवनी या रुग्णालयात उपचारात सुरू आहेत. तीन दिवसांमध्ये गोळीबाराची दुसरी घटना घडल्याने वसई-विरार शहरात खळबळ उडाली असून शहरातील कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी समय चौहान या तरुणाची भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, राठोड यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आसाराम राठोड यांच्यावर २२ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती.

लॉजमध्ये प्रेयसीला नेऊन प्रियकराने गळा दाबून केली हत्या, प्रियकर फरार

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसVirarविरार