शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:43 IST

लग्नाच्या काही दिवसानंतरच सुनीताने पतीचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी तिने त्याच्या हत्येचा कट रचला होता.

रायपूर - छत्तीसगडच्या बलरामपूर येथे एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी नवविवाहित पत्नीने लग्नाच्या १ महिन्यानंतरच पतीला किटकनाशक औषध पाजून मारले आहे. याआधी तीन वेळा पत्नीने पतीच्या हत्येचा प्रयत्न केला परंतु चौथ्या प्रयत्नात तिला यश आले. सध्या या आरोपी पत्नीला पोलिसांना अटक करून जेलमध्ये पाठवले आहे.

२२ वर्षीय बुदनाथचे ११ मे रोजी बलरामपूरच्या बिशनपूर इथल्या सुनीता नावाच्या मुलीशी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवस सुनीता सासरी राहिली त्यानंतर ती माहेरी निघून गेली. सासरच्यांनी वारंवार बोलावूनही सुनीता तिच्या सासरी परतली नाही. त्यानंतर ५ जून रोजी पंचायत बोलवण्यात आली. त्यात झालेल्या निर्णयानंतर सुनीता तिच्या मर्जीविरोधात सासरी जावे लागले. परंतु पतीपासून सुटका व्हावी असा तिचा प्रयत्न होता. तिला पतीसोबत राहायचे नव्हते. सुनीताला मुलगा पसंत नव्हता तरीही तिच्या घरच्यांनी बुदनाथसोबत तिचे लग्न लावून दिले. 

लग्नाच्या काही दिवसानंतरच सुनीताने पतीचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी तिने त्याच्या हत्येचा कट रचला होता. याआधीही तीन वेळा सुनीताने तिच्या पतीला मारण्याचा प्रयत्न केला परंतु तिला यश आले नाही. पंचायतीच्या निर्णयानंतर सुनीता जेव्हा सासरी येत होती तेव्हा ती बाजारात गेली. तिथे कीटक मारण्यासाठी औषध खरेदी केले. त्यानंतर सासरी जाऊन तिच्या पतीसाठी चिकन भात बनवला आणि त्या जेवणात कीटकनाशक औषध मिसळले. या प्रकारात पतीचा मृत्यू झाला आहे. 

वर्दीचा धाक दाखवतात सत्य समोर आले

मुलाच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्या तक्रारीत मुलगा जेवण करून झोपला होता. त्यानंतर तो कधीच उठला नाही असं म्हटले. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मृतकाच्या पत्नीला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. पतीच्या मृत्यूबाबत पत्नी उडवाउडवीची उत्तरे देत होती. त्यात खाकी वर्दीचा धाक दाखवताच तिने तिचे काळे कृत्य उघड केले. सध्या महिलेला पोलिसांनी अटक करून जेलमध्ये पाठवले आहे. या प्रकरणाची आणखी चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी