शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
2
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
3
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
4
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
5
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
6
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
7
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
8
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
9
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
10
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
11
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
12
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
13
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
14
Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक
15
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
16
IND W vs SA W: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना ठरणार 'ऐतिहासिक'!
17
PhysicsWallah IPO: पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
18
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
19
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
20
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...

४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:05 IST

मयुरी ही उच्चशिक्षित होती, तिचे बीएससी ऍग्रीपर्यंत शिक्षण झाले होते. ती खंबीर असल्याने आत्महत्या करूच शकत नाही असा ठाम विश्वास मयुरीच्या बहिणीने व्यक्त केला आहे

बुलढाणा - जळगावात गौरव ठोसर या तरुणासोबत ४ महिन्यांपूर्वी १० मे २०२५ ला लग्न झालेल्या मयुरी बुडुकले या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हुंड्याच्या मागणीवरून सासरच्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप मयुरीच्या घरच्यांनी केला आहे. मयुरीने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे असा गंभीर आरोप पीडित मुलीच्या कुटुंबाने केला आहे. 

याबाबत मयुरीचे वडील भगवान बुडुकले म्हणाले की, १० मे रोजी माझ्या मुलीचे लग्न गौरवशी झाले होते. लग्नात ठरल्याप्रमाणे पाच लाख रुपये हुंडा देण्यात आला. मात्र लग्नाच्या एक महिन्यानंतर मेडिकल टाकण्यासाठी स्वतःची दुकान घ्यायचंय असं सांगत तिच्या सासरच्यांनी १० लाखांची मागणी केली. या हुंड्यासाठी मयुरीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. त्यामुळे कशीबशी ८ लाखांची जुळवाजुळव करून आम्ही ही रक्कम मयुरीच्या सासरच्यांना दिली, त्यानंतर उर्वरित २ लाख काही दिवसांनी देऊ असं सांगितले. मात्र पैशांसाठी मुलीच्या मागे तगादा सुरूच होता. घटनेच्या दिवशी दुपारी एक ते दीड वाजता मयुरीसोबत बोलणे झाले होते. त्यानंतर अचानक आम्हाला कॉल आला आणि तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय मयुरीच्या मृत्यूनंतर सर्व नातेवाईकांनी ताबडतोब जळगावचं रुग्णालय गाठले. मात्र त्या ठिकाणी सासरच कोणीही हजर नव्हते आणि मृतदेह दवाखान्यात बेवारसपणे ठेवल्याचे सांगण्यात आले. या प्रकारानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धडक देत आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याची तक्रार नोंदवली.  पोलिसांनी सहकार्य न करता तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. अंगावर तक्रारीची प्रत फेकून गैरवर्तणूक केल्याचा आरोप मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. मयुरी ही उच्चशिक्षित होती, तिचे बीएससी ऍग्रीपर्यंत शिक्षण झाले होते. ती खंबीर असल्याने आत्महत्या करूच शकत नाही असा ठाम विश्वास मयुरीच्या बहिणीने व्यक्त केला आहे. शिवाय मयुरीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आणि वणदेखील पाहिल्याचं कुटुंबाने म्हटलं. 

दरम्यान, मयुरीची आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा खून केला आहे. आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. या प्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडून काढून एसआयटी मार्फत करण्यात यावा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेणार आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी