शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पती, पत्नी और वो..! मुलीच्या हत्येनंतर माहेरच्यांनी पतीच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 15:26 IST

निशाच्या घरच्यांनी तिच्या मृत्यूला पती मुकेश कुमारचं अफेअर जबाबदार असल्याचे म्हटलं आहे.

गोपालगंज  - बिहारच्या गोपालगंज परिसरात एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुलीकडच्यांनी सासरच्यांवर हत्येचा आरोप केला आहे. मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या घटनेनंतर संतप्त माहेरच्यांनी सासरच्या घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केला. या प्रकारानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. बिहारच्या मांझागडच्या आलापूर गावातील ही घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मृत महिलेचे नाव निशा कुमारी आहे. २२ वर्षीय निशा कुमारी बडहरिया गावातील शंभू प्रसाद यांची मुलगी आहे. निशाचे लग्न माझागड आलापूर रहिवासी डॉ. मुकेश कुमारसोबत झाले. निशाच्या घरच्यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारीला धूमधडाक्यात मुलीचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी निशाला पतीच्या दुसऱ्या अफेअरबाबत समजले. त्यागोष्टीवरून निशा आणि पतीमध्ये सातत्याने वाद होत होता. याबाबत निशाने माहेरच्यांनाही फोन करून सांगितले.

निशाच्या घरच्यांनी तिच्या मृत्यूला पती मुकेश कुमारचं अफेअर जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. यातून होणाऱ्या वादातून मुकेश पत्नीला मारहाण करत असे. पत्नीचा विरोध त्याने गळा दाबून निशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. पोस्टमोर्टमनंतर मृतदेह निशाच्या घरच्यांना दिला. परंतु नाराज माहेरच्या लोकांनी निशाचा मृतदेह घेऊन पतीच्या घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तणाव पाहता पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी दाखल झाली. निशाच्या घरच्यांनी पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे.