शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

काळीज हादरवणारी घटना! मृत मुलीचा पाय थैलीत घेऊन बाप पोलिसांकडे पोहचला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 18:42 IST

सध्या पोलिसांनी हा पाय चाचणीसाठी लॅबला पाठवला आहे. तर आरोपी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

बिहारच्या भोजपूर परिसरात काळीज हादरवणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी थैलीत मुलीचा पाय घेऊन पोलीस स्टेशनला पोहचलेल्या बापाला पाहून पोलीस हादरले. मुलगी वारंवार सांगत होती, बाबा मला इथून घेऊन चला, परंतु मी तिला वाचवू शकलो नाही. जोपर्यंत मी तिच्याकडे पोहचलो तोवर तिची राख झाली होती. केवळ एक पाय वाचला. मुलीच्या पायातील पैजणाने तिची ओळख पटली असं बापाने सांगितल्यावर पोलीस सुन्न झाले. 

सध्या पोलिसांनी हा पाय चाचणीसाठी लॅबला पाठवला आहे. तर आरोपी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. बिहारच्या भोजपूर येथील बभनगावात राहणाऱ्या अखिलेश बिंदने त्यांची मुलगी ममताचं लग्न मे २०२१ मध्ये बरौली गावातील शत्रुघ्नशी केले होते. ममताच्या मामाने हे लग्न लावून दिले होते. मृत मुलीचे वडील गुजरातच्या राजकोट येथे पत्नीसोबत राहायला आहेत. तर मुलगी गावात मामासोबत राहत होती. 

मुलीचा पाय घेऊन बापानं पोलीस स्टेशन गाठलंमिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या काही महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी ममतासमोर १ लाख रुपये मागणी केली. पैसे न दिल्याने तिच्यासोबत मारहाण आणि छळ करण्यात आला. ममताला मागील सोमवारी तिच्या सासरच्या मंडळीने जाळून मारून टाकलं असा आरोप मृत मुलीच्या बापाने केला. त्यांना केवळ मुलीचा एक पाय सापडला. ज्यात त्यांनी दिलेले पैजण होते. त्यानंतर एका थैलीत पाय घेऊन बापाने पोलीस ठाणे गाठलं. माझ्या मुलीला न्याय द्यावा अशी मागणी बापाने केली आहे. बापाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. 

ममताने तिच्या मामाला सांगितले होते की, तिचा पती आणि सासरचे लोक पैसे मागत आहेत. आम्ही पैसे दिले नाही म्हणून तिला जाळून मारण्यात आले. या प्रकरणी एएसपी हिमांशू यांनी सांगितले की, पती शत्रुघ्न आणि सासरे राम प्यारे बिंदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सुरुवातीच्या तपासात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह सोन नदी घाटावर आणला गेला. त्याठिकाणी जाळण्यात आले. डाव्या पायाचा काही भाग वाचला होता. जो वडिलांनी घेऊन पोलीस स्टेशनला आले. या पायाची डिएनए चाचणी करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.