शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने केली तरुणीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:19 IST

याप्रकरणी मयत नितुच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी राजूच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी - २३ वर्षीय तरुणीने २४ वर्षीय शेजारी राहणाऱ्या तरुणास प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने सुऱ्याने तरुणीची निर्घृण हत्या करून मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या लहान बहिणीलाही सुऱ्याने वार करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना सोमवारी शहरातील भादवड गावातील कानिफनाथ मंदिराजवळील कृष्णानगर मधील शत्रुघ्न तरे चाळीत घडली आहे.याप्रकरणी हत्या करणाऱ्या आरोपीच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

नितु भान सिंग (२३) असे मयत झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.तर राजू महेंद्र सिंग (२४) असे हत्या करणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी तरुण व मयत तरुणी मूळची उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील ग्राम नेवादा मधील असून सद्यस्थितीत कुटुंबासोबत येथील भादवड गावातील कृष्णानगर मधील भरत तरे यांच्या चाळीतील एका भाड्याच्या खोलीत राहत आहेत.याच ठिकाणी आरोपीही मयत तरुणीच्या शेजारी राहत होता.

आरोपी राजू याच्या प्रेमसंबंधास नितु हिने नकार दिला होता.याच रागातून सोमवारी राजूने नितु घरी एकटी असताना भाजी कापण्याच्या सुऱ्याने नितुच्या शरीरावर सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. यावेळी नितुची लहान बहिण रितूने नितुला वाचवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने रीतुच्या बोटाजवळ सुऱ्याने वार करून तिलाही जखमी केले आहे. याप्रकरणी मयत नितुच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी राजूच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांची कुणकुण लागताच राजू घटना स्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा सीसीटिव्हीच्या आधारे कसून शोध घेत आहेत.पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अतुल अडुरकर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी