शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:59 IST

या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बकरा बांधण्याच्या रस्सीने रॉबिनच्या पत्नीने पतीची गळा दाबून हत्या केली होती.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या चंदीतला जंगलपारा गावात एक हैराण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी इंदूरच्या सोनम आणि मेरठच्या मुस्कानसारखीच पत्नीने पतीची हत्या केली आहे. प्रियकरासोबत राहण्यासाठी पत्नीने पतीला संपवले आहे. दीड महिन्यांनी हा खुलासा समोर आला तेव्हा पोलिसांनी दफन केलेला पतीचा मृतदेह बाहेर काढला. पत्नीने पतीची हत्या करून एका ७ फूट खोल खड्ड्यात त्याचा मृतदेह पुरून ठेवला होता. 

रॉबिन रुइदास नावाचा व्यक्ती ४० दिवस बेपत्ता होता. पोलिसांच्या माहितीनुसार, रॉबिनचा मृतदेह त्याच्या सासरच्या घरापासून अर्धा किमी अंतरावर सापडला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जांगीपारा येथील गावात ट्यूबवेलजवळ हा मृतदेह दफन करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी रॉबिनच्या पत्नीला ताब्यात घेतले. वर्दीचा धाक दाखवताच तिने तिचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर तिने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी खड्डा खणला तेव्हा त्यातून रॉबिनचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बकरा बांधण्याच्या रस्सीने रॉबिनच्या पत्नीने पतीची गळा दाबून हत्या केली होती.

वहिनीने लावला अफेअरचा आरोप

रॉबिनची वहिनी शिखा रुइदास यांनी सांगितले की, अपर्णाचे अन्य कुणासोबत अफेअर सुरू होते. त्यावरून रॉबिनसोबत तिचे भांडण व्हायचे. मात्र मुलांकडे पाहून तो अपर्णाला सोडचिठ्ठी देत नव्हता. त्याचे अपर्णावर खूप प्रेम होते. एक दिवस सगळे ठीक होईल असं त्याला वाटायचे. तो अपर्णाच्या सर्व इच्छा पूर्ण करायचा परंतु ती आनंदी नसायची. अपर्णा माहेरी निघून गेली होती. रॉबिन सर्व काही विसरून तिला परत आणण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला भेटायला सासरी गेला होता. 

२ दिवसांनी घरच्यांनी दिली तक्रार

११ मे रोजी रॉबिन अपर्णाच्या आई वडिलांच्या घरी गेला होता. तिथे तो पत्नी आणि दोन्ही मुलांना भेटला. जेव्हा रात्री तो घरी परतला नाही तेव्हा घरच्यांना चिंता सतावू लागली. रॉबिन त्याच्या सासरीच थांबला असावा असा अंदाज कुटुंबाने बांधला. दुसऱ्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत घरच्यांनी रॉबिनची वाट पाहिली परंतु तो घरी आला नाही. ना अपर्णाच्या घरच्यांनी कॉल केला, ना आमचा कॉल उचलला. रॉबिनचा फोन बंदच येत होता. त्यानंतर अपर्णाने फोनवर रॉबिन कुठे आहे माहिती नाही असं सांगितले. त्यानंतर घरच्यांनी रॉबिन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. २२ जूनला रॉबिनचा मोठा भाऊ बबलू रुइदास याच्या मोबाईलवर अज्ञात कॉल आला त्याने अपर्णाने रॉबिनची हत्या करून मृतदेह दफन केल्याचे सांगितले. बबलूने याबाबत पोलिसांना कळवले, त्यानंतर पोलिसांनी अपर्णाला ताब्यात घेतले. अपर्णाला खाकीचा धाक दाखवताच तिने तिचा गुन्हा कबूल केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी