शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:00 IST

१ वर्षापूर्वी इमरान याच परिसरात राहायला आला होता. त्यामुळे हा वाद आणखी वाढला होता. एक वर्षापूर्वी समीर दुबईला गेल्याचे रूबीने शेजाऱ्यांना सांगितले होते.

अहमदाबाद - उत्तर प्रदेशच्या मुस्कान रस्तोगी आणि मध्य प्रदेशच्या सोनम रघुवंशीसारखेच भयंकर कृत्य गुजरातच्या अहमदाबाद येथे रूबीने केले आहे. याठिकाणी फतेवाडी परिसरात घडलेल्या घटनेने सगळेच हैराण झाले आहेत. रुबीने तिचा प्रियकर आणि २ मित्रांसोबत मिळून पती समीर अंसारीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून घरच्या किचनमध्ये गाडले. त्यावर सिमेंट आणि टाइल्स लावून हे हत्याकांड लपवण्याचा प्रयत्न केला. १४ महिने या घटनेची कुणाला भनकही लागली नाही. 

अहमदाबाद क्राइम ब्रांचला ३ महिन्यापूर्वी गुप्त माहिती मिळाली. फतेवाडी येथे राहणारा समीर अंसारी गेल्या वर्षभरापासून गायब आहे, परंतु त्याच्या बेपत्ता होण्यामागे अत्यंत खतरनाक सत्य दडले होते. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला तेव्हा मागील १४ महिन्यापासून समीरचा मोबाईल बंद असल्याचं कळले. तो कुणाच्याही संपर्कात नव्हता. इतका काळ तो कुठे आहे याची माहिती कुणाला नव्हती. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर तपासाची चक्रे वाऱ्याच्या वेगाने फिरली. या घटनेबाबत डीपीसी अजीत राजियान यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, १४ महिन्यापासून बेपत्ता असलेल्या समीर अंसारीची हत्या त्याची पत्नी रूबीने केली होती. या हत्येत रूबीचा प्रियकर इमरान आणि त्याच्या २ मित्रांचा समावेश आहे. पोलिसांनी इमरानला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. रुबीच्या सांगण्यावरून समीरची हत्या केल्याचं पोलीस चौकशीत समोर आले. या चौघांनी मिळून समीरची ठरवून हत्या केली होती.

हात-पाय बांधून जीवे मारले

आरोपींनी आधी समीर अंसारीचे हातपाय बांधले,  त्यानंतर शस्त्राने त्याच्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर समीरच्या मृतदेहाचे तुकडे कापून किचनमधील जमिनीखाली गाडून टाकले. त्यावर सिमेंट टाकून टाईल्स लावली, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. क्राइम ब्रांचच्या पथकाने समीरच्या घरी खोदकाम सुरू केले, जिथे तो रूबीसोबत राहत होता. तेव्हा मानवी सांगाडा सापडला. पोलिसांनी मानवी हाडे जप्त करून डीएनए चाचणीसाठी पाठवली. रुबी आणि समीर मागील ५ वर्षापासून या परिसरात राहत होते. ३ वर्षापूर्वी या दोघांनी लग्न केले. त्यानंतर रूबी आणि इमरान यांच्या नात्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण होत असे. १ वर्षापूर्वी इमरान याच परिसरात राहायला आला होता. त्यामुळे हा वाद आणखी वाढला होता. एक वर्षापूर्वी समीर दुबईला गेल्याचे रूबीने शेजाऱ्यांना सांगितले होते.

हत्येनंतर घर भाड्याने दिले

रूबी आणि इमरान सातत्याने एकत्र दिसत होते. कुणीही समीरला वर्षभरापासून पाहिले नाही. मंगळवारी रात्री जेव्हा पोलीस इमरानला घेऊन खोलीवर आली तेव्हा समीरच्या हत्येचे सत्य उघड झाले. पत्नीने प्रियकरासोबत मिळून समीरची हत्या केली होती. हत्येनंतर काही महिने रूबी त्याच घरात राहत होती. त्यानंतर तिने घर भाड्याने दिले होते. रुबीच्या लग्नानंतर समीर त्याची आई आणि नातेवाईकांच्या संपर्कात नव्हता. त्यामुळे समीरच्या हत्येचे रहस्य १४ महिने गूढच राहिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife, lover kill husband, bury body parts in kitchen: Mystery solved

Web Summary : In Ahmedabad, a woman and her lover murdered her husband, dismembered his body, and buried the remains in their kitchen. The crime remained undetected for 14 months until police uncovered the gruesome act after a tip-off. The wife and her lover have been arrested.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी