शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Narendra Modi: 'पुढचा नंबर मोदींचा...' म्हणणारा इम्रान खानचा मित्र ब्रिटनमध्ये लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 11:42 IST

Lord Nazir Ahmed Guilty Of Sex Offences: कामगार पक्षाचा माजी नेता राहिलेल्या लॉर्ड नझीरला मुलासोबत अनैसर्गिक मैथुन आणि मुलीवर दोनदा बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.

लंडन: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा मित्र आणि ब्रिटनचे वादग्रस्त मुस्लिम नेता लॉर्ड नझीर अहमद याला दोन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. नझीरला बुधवारी १९७० च्या दशकात अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण आणि एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. नझीर हा पाकिस्तानात जन्मलेला असून तो नेहमी भारताविरोधात काश्मीरवरून विष ओकण्याचे काम करत असतो. एवढेच नाही तर त्याने एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मृत्यूसाठी प्रार्थना केली होती. 

कामगार पक्षाचा माजी नेता राहिलेल्या लॉर्ड नझीरला मुलासोबत अनैसर्गिक मैथुन आणि मुलीवर दोनदा बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. नझीरसोबत त्याचे दोन भाऊ मोहम्मद फारुक आणि मोहम्मद तारीक यांच्याविरोधात देखील आरोप खरे ठरले आहेत. नझीरचे दोन्ही भावांचे वय अधिक असल्याने त्यांना केसमध्ये सहभागी करण्यास अनफिट धरण्यात आले. एका महिलेने मोठी झाल्यावर नझीर अहमदने १९७३ आणि १९७४ मध्ये दोनदा बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. 

त्यावेळी नजीर 16 किंवा 17 वर्षांचा होता आणि पीडित मुलगी त्याच्यापेक्षा खूपच लहान होती. नझीरला 1972 मध्ये एका लहान मुलावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. नजीर अहमद यांनी हे आरोप दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटले होते आणि सर्व आरोप फेटाळून लावले होते. खटल्यादरम्यान, नझीर अहमद बलात्काराचा प्रयत्न आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधात दोषी आढळला. ब्रिटनचे न्यायालय आता ४ फेब्रुवारीला या प्रकरणी शिक्षा सुनावणार आहे.

लॉर्ड नझीर अहमद हे लेबर पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या जवळचे आहेत. लॉर्ड नझीर अहमद हे ब्रिटीश संसदेचे वरचे सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्सचे आजीवन सदस्य म्हणून नियुक्त झालेले पहिले मुस्लिम खासदार आहेत. ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उच्च शिक्षित आणि ज्ञानी लोकांना सदस्य बनवले जाते. लॉर्ड नझीर अनेकदा भारताविरुद्ध विधाने करत असतात. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान