शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

जागेच्या वादातून खून करणाऱ्या आरोपीला कारावास

By जितेंद्र कालेकर | Updated: September 26, 2024 23:37 IST

ठाणे न्यायालयाचा आदेश : १४ वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येला मिळाला न्याय

ठाणे : जागेच्या वादातून झालेल्या हल्ल्यामध्ये मलिक सिकंदर सुरमे यांचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी शाहीद गुलाम मुस्तफा सुरमे (४५) याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश वसुधा भोसले यांनी दोषी ठरवून त्याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 

सुमारे १४ वर्षांपूर्वी झालेल्या या हत्येला न्याय मिळाल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी गुरुवारी दिली. ही घटना दि. ३ डिसेंबर २०१० रोजी मुंब्रा भागात घडली होती. मुंब्रा-कौसा जामा मशिदीचे ट्रस्टी अब्दुल गणी अब्दुल मजिद डोंगरे आणि मलिक सिकंदर सुरमे, लियाकत ढोले यांच्या ट्रस्टीच्या जागेच्या वादातून अब्दुल गणी डोंगरे आणि शाहिद सुरमे यांनी कट रचून सुरमे तसेच ढोले यांच्यावर खुनी हल्ला केल्याचा आरोप होता. 

या घटनेमध्ये मलिक सुरमे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३०७ आणि १२० ब सह आर्म ॲक्ट ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.  याच गुन्ह्याचा प्राथमिक तपास मुंब्रा पोलिस आणि त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने करून पुरावे गोळा केले. तसेच याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. याच खटल्याची सुनावणी न्यायाधीश वसुधा भोसले यांच्या न्यायालयात २५ सप्टेंबर रोजी झाली. 

सुनावणीदरम्यान सरकारी वकील वर्षा चंदने यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपी शाहीद याला न्यायालयाने दोषी ठरविले. त्याला आजीवन सश्रम कारावास आणि १३ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सादिक यांनी केला. मुंब्रा पोलिस ठाण्याचे हवालदार विद्यासागर कोळी यांनी न्यायालयात ठोस पुरावे सादर केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंग