शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाचे शिर मिळणे अशक्य; पाणी उपसून अख्खा तलाव केला होता रिकामा, जंगलात सापडला जबडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 07:07 IST

आफताबच्या घरातून पाच चाकू, एक इलेक्ट्रिक करवत जप्त करण्यात आली आहे. हे सर्व चाकू सहा इंची आहेत. शेफ म्हणून ते त्याच्या कामाचे होते की, त्याने क्षद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी ते वापरले, याचा तपास पोलिस करत आहेत.

मुंबई : हत्येनंतर श्रद्धाचे शिर तलावात टाकल्याचे आधी आफताबने म्हटले होते. त्यामुळे पाणी उपसून अख्खा तलाव रिकामा करण्यात आला, पण त्यात शिर मिळाले नाही. नंतर जंगलात तिच्या जबड्याचा भाग सापडला. त्यातही दातांचा भाग आहे. 

त्यामुळे आता शिर मिळण्याची शक्यता कमी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जंगलातील काही प्राण्यांनी शिर खाल्ले असावे, असा त्यांचा संशय आहे. रक्ताच्या वासाने प्राण्यांनी तिच्या मृतदेहाचे तुकडे खाऊन नष्ट करावेत म्हणूनच तो ते जंगलात टाकत होता, असे तपास अधिकाऱ्यांना वाटते. 

‘कबुली दिलेली नाही’ -श्रद्धाची हत्या केल्याचा गुन्हा आफताबने कबूल केलेला नाही, असे म्हणणे त्याच्या वकिलांनी मांडले. त्याचे वकील अविनाश कुमार म्हणाले, मी आफताबला भेटलो, तेव्हा मला तो आक्रमक वाटला नाही. शांत होता. त्याने अद्याप खून केल्याची कबुली दिलेली नाही.

वकिलांना हल्ल्याची भीती -हत्याकांडामुळे संतप्त झालेल्या काही संघटना आफताबवर हल्ला करतील, असा संशय त्याच्या वकिलांनी व्यक्त केला आहे. त्यात धार्मिक संघटनांचा समावेश असू शकतो, असे म्हणणे त्यांनी मांडले.

पाच चाकू जप्त -आफताबच्या घरातून पाच चाकू, एक इलेक्ट्रिक करवत जप्त करण्यात आली आहे. हे सर्व चाकू सहा इंची आहेत. शेफ म्हणून ते त्याच्या कामाचे होते की, त्याने क्षद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी ते वापरले, याचा तपास पोलिस करत आहेत. त्यासाठी पाचही चाकू फाॅरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

थंड डोक्याने प्लॅनिंग -आफताबने श्रद्धाच्या हत्येचे शांतपणे प्लॅनिंग करूनच तिचा खून केल्याचा निष्कर्ष दिल्ली पोलिसांनी आतापर्यंतच्या शोधकार्यातून काढला आहे. त्यांच्यात नेमके कशावरून खटके उडत होते आणि तो खूप आधीपासून तिच्या हत्येचा विचार करत होता. त्यामुळेच त्याने हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, कुठे लावयाची, पुरावे कसे नष्ट करायचे हेही ठरविल्याचे आतापर्यंतच्या तपासातून दिसून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिसMumbaiमुंबई