शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

Crime News: अनैतिक संबंधांस अडथळा, पत्नीने पतीला शेतात नेले; तोंड, नाक, गळा दाबून ठार मारले

By आशपाक पठाण | Updated: November 2, 2022 22:32 IST

Extra Marital Affairs, Crime News: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना औसा तालुक्यातील गाडवेवाडी शिवारात बुधवारी घडली. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात पत्नीसह चार जणांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- अशफाक पठाणकिल्लारी (जि. लातूर) : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना औसा तालुक्यातील गाडवेवाडी शिवारात बुधवारी घडली. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात पत्नीसह चार जणांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, तपसे चिंचोली येथील कमल कुमार बलसुरे (वय २८) हिचे लामजना येथील नातेवाईक मामाचा मुलगा विष्णू शंकर लांडगे या तरुणाशी संबंध होते. या संबंधास पतीचा अडथळा येत असल्यामुळे तिने प्रियकर विष्णू लांडगे व सोबत विजय साहेबराव गवळी, योगेश बळी कांबळे (रा. लामजना, ता. औसा) यांना सोबत घेऊन कट चरला. पती कुमार बळीराम बलसुरे (वय ३५, रा. तपसे चिचोली) याला १ नोव्हेंबर रोजी रात्री मोटारसायकलवर बसवून गाडवेवाडी शिवारात नेले. याठिकाणी त्याचे तोंड, नाक, गळा दाबून खून केला, अशी फिर्याद मयताचा भाऊ भागवत बळीराम बलसुरे यांनी दिली. याप्रकरणी पत्नीसह चार जणांवर किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक पवार, किल्लारी पोलीस ठाण्याचे सपोनि. गायकवाड, पीएसआय राजपूत यांनी भेट देऊन पाहणी केली.

चार तासात गुन्हा उघड...प्रियकर व त्याच्या काही साथीदारांना सोबत घेऊन पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास किल्लारी पोलीस ठाण्याचे बीट जमादार सचिन उस्तुर्गे यांना ही बाब कळली. त्यानंतर किल्लारीचे सपोनि. गायकवाड, उस्तुर्गे, आबा इंगळे, किसन मर्डे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मयताचे घर गाठले. यावेळी मयताची पत्नी कमल बलसुरे, प्रियकर विष्णू लांडगे यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिल्याचे सपोनि. गायकवाड यांनी सांगितले. मयत कुमार बलसुरे यांना दोन मुले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर