शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

शेतीसाठी दिलेल्या जमिनीची बेकायदा विक्री, कोट्यवधींचा गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:12 IST

Crime News : तारापूरजवळील कांबोडा मच्छीमार सामुदायिक सोसायटीला केवळ शेतीसाठी दिलेली शासकीय जमीन विक्री करताना शासनाची कोणतीही परवानगी सोसायटीने न घेता परस्पर व बेकायदेशीर विकली आहे.

बोईसर - तारापूरजवळील कांबोडा मच्छीमार सामुदायिक सोसायटीला केवळ शेतीसाठी दिलेली शासकीय जमीन विक्री करताना शासनाची कोणतीही परवानगी सोसायटीने न घेता परस्पर व बेकायदेशीर विकली आहे. या व्यवहारात सुमारे १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप तारापूर परिसर विकास समितीचे अध्यक्ष जितेंद्र राऊळ यांनी पत्रकार परिषदेत करून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तारापूर अणुऊर्जा केंद्र व भाभा अणू संशोधन केंद्र या देशाच्या अत्यंत संवेदनशील अशा दोन्ही प्रकल्पांच्या प्रतिबंधित क्षेत्रापासून अवघ्या अडीच कि.मी. अंतरावर असलेल्या सर्व्हे नं. १२८/१/१ अ च्या जमिनीस गट नं. ६४ पैकी सुमारे ७२ एकर २५ गुंठे क्षेत्र असलेली शासकीय जमीन कांबोडे मच्छीमार सामुदायिक सोसायटीला १९७३ व १९७८ साली अशा दोन टप्प्यांत नवीन अविभाज्य शर्तीने केवळ शेती प्रयोजनासाठी अटी व शर्तीवर देण्यात आली होती. मात्र, या सोसायटीने या शासकीय जमिनीपैकी काही जमीन एका इसमास भाडेपट्टीवर, तर ४८ एकर जमीन शासनाच्या परवानगीशिवाय परस्पर लिलाव केल्यानंतर स्थानिकांनी महसूल खात्याकडे करवाईची मागणी केली. मात्र, महसूल अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे डोळेझाक केल्याचा आरोप राऊळ यांनी केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार