शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! 'चाइल्ड पोर्नोग्राफी' सर्च केल्यास पोलीस धडकणार तुमच्या दारात; सायबर सेलची करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 08:08 IST

फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांच्या माध्यमातून चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणारे, तसेच मित्राला शेअर केल्याच्या आरोपावरून शहरातील १४  जणांवर  सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे.

औरंगाबाद : बालकांचा लैंगिक कृत्यासाठी वापर करणे, त्यांची छायाचित्रे, व्हिडिओ क्लीप बनविणे आणि ती प्रसारित करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. इंटरनेटवर चाइल्ड पोर्नोग्राफी हा शब्द टाइप करण्यापासून ते चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणारे, प्रसार करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सायबर पोलीस विभाग इंटरनेटवर नजर ठेवून आहेत. इंटरनेटवर चाइल्ड पोर्नोग्राफी सर्च केले तर पोलीस थेट तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतात.

फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांच्या माध्यमातून चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणारे, तसेच मित्राला शेअर केल्याच्या आरोपावरून शहरातील १४  जणांवर  सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने शेकडो पोर्नोग्राफी वेबसाइट बंद केल्या तरी आजही पोर्नोग्राफीच्या हजारो साइट इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पोर्नोग्राफी पाहणारांची संख्या कमी नाही. सामाजमाध्यमांवर बालकांच्या पोर्नोग्राफीची क्लीप वा छायाचित्रे अपलोड आणि डाऊनलोड करणे आणि ती प्रसारित करणे हा गुन्हा आहे. सायबर पोलिसांनी औरंगाबाद शहरात गतवर्षी ९ व यावर्षी ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटकही केली आहे.

...अशी आहे तुमच्यावर नजरपोर्नोग्राफीकरिता बालकांचा उपयोग होऊ नये याकरिता अमेरिकेत व भारतात कडक कायदे आहेत. सोशल मीडियांच्या कंपन्यांचे सर्व्हर अमेरिकेत असल्याने तेथील नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ॲण्ड एक्सपोलाइड चिल्ड्रन संस्था काम करते. इंटरनेटवर चाइल्ड पोर्नोग्राफ हा शब्द सर्च करणे, डाऊनलोड करणे, अपलोड करणारांचा शोध घेऊन त्यांची माहिती केंद्र सरकारला पाठविली जाते. केंद्राकडून महाराष्ट्र सायबर सेलला त्या वापरकर्त्यांची माहिती, शिवाय त्याने अपलोड, डाऊनलोड केलेले वा प्रसारित केलेल्या सीडीसह एक टीप पाठविली जाते. नंतर महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांतील सायबर पोलिसांना ही माहिती पाठवण्यात येते.

टॅग्स :Policeपोलिसcyber crimeसायबर क्राइम