नवी दिल्ली - सोशल मीडियावर कोणतीही काळजी न घेता रील्स बनवणाऱ्या किंवा व्हिडीओ आणि फोटो शेअर करणाऱ्यांनो सावधान! सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो आणि रील्स शेअर केल्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. सायबर गुन्हेगार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा वापर करून महिला आणि मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत आहेत. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलच्या आकडेवारीनुसार, भारतात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
अल्पवयीन मुली ठरताहेत बळीऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुली सायबर गुन्हेगारांच्या सर्वाधिक टार्गेटवर आहेत. विशेष म्हणजे मुलींच्या छायाचित्रांशी छेडछाड करून त्यांची डार्क नेटद्वारे विक्री केली जात आहे.
बनावट प्रोफाइल, चॅटिंगद्वारे फसवणूक वाढली२०२४ मध्ये ऑनलाइन धमक्या, सोशल मीडियावरील प्रोफाइलवर लक्ष ठेवणे, बनावट प्रोफाइल तयार करून ब्लॅकमेल करणे आणि चॅटिंगद्वारे फसवणे आणि लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणे अशा तक्रारीत वाढ झाली आहे. जास्तीत जास्त महिलासंबंधी तक्रारींमध्ये एआयच्या माध्यमातून डीपफेकचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये पोलिस कारवाई करत असले तरी महिलांनीही तितकीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
डीपफेकच्या मदतीने अश्लील चित्रे सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर महिला, तरुणींच्या प्रोफाइलवर सतत लक्ष ठेवून असतात. ते आपल्याला फॉलो करतात आणि ग्रुपमध्ये सहभागी होतात.यानंतर डीपफेकच्या मदतीने अश्लील चित्रे तयार करून मुलींना पाठवली जातात. यानंतर मुलींना घाबरवत ब्लॅकमेलिंग सुरू होते.
ही खबरदारी घ्याअनोळखी व्हिडीओ कॉल उचलू नका.ज्या वेबसाइट्सची यूआरएल लॉक केलेली आहे अशा वेबसाइट उघडू नका.सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करू नका.तुम्ही ब्लॅकमेलला बळी पडत असाल तर पोलिसांची मदत घ्या.सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो शेअर करणे टाळा.
एआय टूल्समुळे सेक्सटॉर्शन टोळीचा मार्ग सोपा झाला आहे. यामुळे फोटो आणि व्हिडीओंशी छेडछाड करणे सोपे होते. एआय टूलच्या मदतीने अनेक लोकांचे महाकुंभ स्नानाचे फोटो एडिट करून व्हायरल केले जात आहेत. - सन्नी नेहरा, सायबर एक्सपर्ट