शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

“माझं ऐकलं नाही तर, तुझ्या आईला मारुन टाकेन”; धमकी देत विद्यार्थिनीवर शिक्षकाचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 19:57 IST

शिक्षक हा कोचिंग क्लासचा संचालक आहे. मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

होशंगाबाद – मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी भयानक घटना घडली आहे. याठिकाणी एका शिक्षकाने स्वत:च्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिकार बनवलं आहे. विद्यार्थिनीला धमकी देऊन शिक्षक तिच्यावर अतिप्रसंग करायचा. अनेक महिने शिक्षकाने दहशतीचा फायदा घेत विद्यार्थिनीवर बलात्कार केला. मात्र आता हे प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षकाविरोधात संतापाची लाट पसरली आहे.

शिक्षक हा कोचिंग क्लासचा संचालक आहे. मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी हा काशिव सर एकेडमीचा संचालक आहे. त्याचे नाव यूके काशिव आहे. अनेक दिवसांपासून शिक्षक विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करत होता. बुधवारी पुन्हा त्याने मुलीचा छेड काढली. ज्यानंतर पीडित मुलीची सहनशीलता संपली आणि तिने तिच्यावरील अत्याचाराची माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने यूके काशिव याच्याविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून शिक्षकाला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर अडीच तासांनी कोचिंग सेंटर बंद करण्यात आलं. याबाबत एसडीओपी मंजू चौहान म्हणाले की, हाऊसिंग बोर्ड येथील काशिव एकेडमीमध्ये ११ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर हा प्रसंग आला आहे. ती कोचिंग क्लासमध्ये शिकण्यासाठी येत होती. या मुलीच्या वडिलांचं निधन झालं आहे. कोचिंग क्लासचे संचालक काशिव हे माजी सैनिक आहेत. त्याने विद्यार्थिनीच्या आईचा अपघात करण्याची धमकी देत जानेवारीपासून तिच्यासोबत बलात्कार केला. त्यानंतर मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत तिचं लैंगिक शोषण सातत्याने करत गेला.

टॅग्स :Policeपोलिस