शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

टीव्ही पाहून मिळाली आयडिया; पतीने आधी पत्नीला संपवलं, त्यानंतर तिचा मृतदेह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 09:08 IST

पोलिसांनी ज्या ठिकाणाहून बॅग जप्त केली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली.

गुरुग्राम - शहरातील सुटकेस कांडमध्ये नवा खुलासा झाला असून आरोपीने टीव्ही आणि वृत्तपत्रातून मृतदेह सुटकेसमध्ये टाकून फेकून दिल्याच्या बातम्या ऐकल्या आणि वाचल्या होत्या. तेच पाहून पतीला पत्नीची हत्या करून मृतदेहाचा बंदोबस्त करण्याची आयडिया सापडली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. 

मागील सोमवारी गुरुग्रामच्या चौकात रस्त्याशेजारी एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. एका ऑटो चालकाची नजर त्या बॅगवर गेली त्याने पोलिसांना याबाबत कळवलं. सूचना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर जेव्हा बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यात एक मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. हा मृतदेह एका मुलीचा होता. तिच्या अंगावर कपडे नव्हते. शरीरावर झालेल्या जखमा पाहून तिच्यावर क्रूर अत्याचार झाल्याचं दिसून येते. 

सर्वात विचित्र म्हणजे मृत मुलीच्या हातावर चाकूने आणि जाळण्याचा प्रयत्न झाल्याच्या खूणा आढळल्या. कदाचित हातावर टॅटू असण्याची शक्यता होती. त्याला मिटवण्याचा प्रयत्न झाला असावा. बॅगेत मृतदेहाशिवाय इतर काहीही सापडले नाही. ज्यामुळे मृत मुलीची ओळख पटवता येईल. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. 

पोलिसांनी ज्या ठिकाणाहून बॅग जप्त केली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. योगायोगाने एका कॅमेऱ्यात एक माणूस तीच बॅग रस्त्यावर ओढताना दिसतो. भरदिवसा मृतदेह ठेवून, बॅग घेत बेधडकपणे रस्त्याने चालत होते. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अखेर पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली आणि लवकरच त्याला पकडले. त्याने आपला गुन्हाही कबूल केला. पण त्याने सांगितलेली हत्येची कहाणी खूप विचित्र होती.

आरोपी भाड्याच्या घरात राहत होताआरोपी मारेकऱ्याचे नाव राहुल आहे. आणि ज्या महिलेचा मृतदेह बॅगेत सापडला ती त्याची पत्नी प्रियांका होती. दोघेही यूपीचे रहिवासी आहेत. दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी दीड वर्षांपूर्वी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. लग्नानंतर दोघेही गुरुग्रामला आले आणि तिथे भाड्याच्या घरात राहू लागले. राहुल गुरुग्राममध्ये एका कंपनीत काम करायचा. त्यांचा पगार फक्त १२ हजार रुपये होता.चौकशीत राहुलने पोलिसांना सांगितले की, लग्नानंतर पत्नीने कधी टीव्ही तर कधी महागड्या मोबाईलची मागणी करायला सुरुवात केली. हे सर्व विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये भांडण सुरू झाले. सततच्या मागण्या आणि दिवसेंदिवस होणाऱ्या भांडणांना कंटाळून राहुलने पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. 

टीव्ही पाहिल्यानंतर आटडिया मिळालीबॅगमध्ये मृतदेहाच्या अनेक कथा त्यांनी टीव्ही आणि वर्तमानपत्रात पाहिल्या आणि वाचल्या होत्या. १६ ऑक्टोबरच्या रात्री त्याचे पुन्हा पत्नीसोबत भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नी प्रियांकाचा गळा आवळून खून केला. पत्नीच्या हातावर त्याच्या नावाचा टॅटूही कोरला होता.त्यामुळे तो टॅटू पुसण्यासाठी राहुलने चाकूने पत्नीचा हात खरवडला आणि नंतर पेटवून दिला. यानंतर तो रात्रभर मृतदेहासोबत घरातच राहिला.