उत्तर प्रदेशातील कानपुरात अत्यंत धक्कादायक घडली. काकादेव पोलीस स्टेशन परिसरात एका ३७ वर्षीय कमिशन एजंटने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. रवी यादव असे मृताचे नाव असून, आत्महत्येपूर्वी त्याने पाच पानांची सुसाईड नोट लिहिली, ज्यात त्याने आपल्या मृत्युसाठी दोन जणांना जबाबदार धरले आहे.
शास्त्रीनगर येथील रहिवासी असलेला रवी यादव दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीत कमिशनवर काम करायचा. मिळालेल्या माहितीनुसार, रवीने युवराज यादव नावाच्या व्यक्तीला १० लाख रुपये रोख दिले. दोघांमध्ये असा करार झाला होता की, या पैशातून गाडी खरेदी करायची आणि जो नफा होईल तो समान वाटून घ्यायचा. मात्र, युवराजने रवीची फसवणूक करत पैसे परत देण्यास नकार दिला.
रवीने सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप केले आहेत की, गाडी रवी आणि त्याच्या मित्राच्या नावावर फायनान्स केल्या गेल्या, पण त्याचे पैसे परस्पर युवराजच्या खात्यात जमा झाले. युवराज आणि त्याचा भाऊ संतोष यादव यांनी बँकेशी संगनमत करून हे पैसे हडपल्याचा आरोप रवीने केला आहे. कर्ज वाढल्याने रवी तणावात होता.
रवीने सुसाईड नोटमध्ये आपल्या आईची माफी मागितली. त्याने लिहिले की "आई, मी एक चांगला मुलगा होऊ शकलो नाही. मी सर्व काही ठीक करेन असे नेहमी म्हणायचो, पण मी ते करू शकलो नाही." त्याने आपल्या मृत्युनंतर दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी इच्छाही व्यक्त केली आहे. रवीच्या पश्चात पत्नी दीपिका, दोन मुले आणि आई मानती देवी असा परिवार आहे. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास रवीने राहत्या घरात पंख्याला गळफास घेतला. नातेवाईकांनी त्याला तातडीने हॅलेट रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच काकादेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस प्रभारी राजेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, "आम्हाला पाच पानांची सुसाईड नोट सापडली असून, कुटुंबाच्या तक्रारीवरून तपास सुरू आहे. सुसाईड नोटमधील आरोपांची पडताळणी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल."
Web Summary : Kanpur man, Ravi Yadav, committed suicide, alleging fraud by Yuvraj Yadav in a suicide note. Ravi accused Yuvraj of misappropriating funds from a vehicle deal, leading to debt and distress. Police are investigating the allegations.
Web Summary : कानपुर में रवि यादव नामक व्यक्ति ने आत्महत्या कर ली। सुसाइड नोट में युवराज यादव पर धोखाधड़ी का आरोप लगाया। रवि ने युवराज पर वाहन सौदे से धन के दुरुपयोग का आरोप लगाया, जिससे कर्ज और संकट आया। पुलिस जांच कर रही है।