शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शहरभर 'आय लव्ह यू' लिहिणं पडलं महागात; प्रेमात वेडा झालेला CA पोहोचला तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 18:29 IST

केतन शहा हा व्यवसायाने सीए आहे. मात्र, प्रेमसंदेश लिहून तो एका महिलेला नाहक त्रास देत होता.  

ठळक मुद्देअनेक दिवसांपासून शहा भिंतींवर 'आय लव्ह यू' असे प्रेमसंदेश लिहून तक्रादार महिलेला त्रास देत होता.केतन शहा हा व्यवसायाने सीए आहे. मात्र, प्रेमसंदेश लिहून तो एका महिलेला नाहक त्रास देत होता.  . ती ज्या ज्या ठिकाणी वावरत असे त्याठिकाणी तिला हे संदेश दिसायचे.

मुंबई - प्रेमापोटी एका महिलेसाठी भिंतीवर, रस्त्यांवरील फलकांवर, इमारतीच्या फलकांवर प्रेमसंदेश एका उच्च शिक्षित पुरुषाने लिहिल्याची धक्कादायक घटना चेंबूर येथे घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय केतन शहा याला चेंबूर पोलिसांनीअटक केली आहे. या प्रेमसंदेशांचा त्रास होत असल्याची तक्रार संबंधित महिलेने डिसेंबरमध्ये पोलिसांकडे केली होती. केतन शहा हा व्यवसायाने सीए आहे. मात्र, प्रेमसंदेश लिहून तो एका महिलेला नाहक त्रास देत होता.  

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिवसांपासून शहा भिंतींवर 'आय लव्ह यू' असे प्रेमसंदेश लिहून तक्रादार महिलेला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून महिलेने चेंबूर पोलीस ठाण्यात या प्रेमसंदेशांचा त्रास होत असल्याची तक्रार दाखल केली. ती ज्या ज्या ठिकाणी वावरत असे त्याठिकाणी तिला हे संदेश दिसायचे. यापैकी काही संदेशांमध्ये तिचं नावाचा देखील उल्लेख करण्यात आला होता. तरीदेखील तिने दुर्लक्ष केलं. मात्र एकेदिवशी ती राहत असलेल्या इमारतीच्या भिंतीवरही प्रेमसंदेश लिहिलेले तिला आढळले. हे सर्व कोण करत आहे याबाबत महिलेला कोणतीही माहिती नव्हती. त्यानंतर मात्र, तिने पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात तिने तक्रार दाखल केली. 

या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रेमसंदेशांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी संदेश लिहिले होते त्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून त्यांना शहाच्या गाडीचा नंबर कळला. त्यानंतर तो संदेश लिहित असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. सध्या शहा पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.   

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसWomenमहिला