शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

I Love U Papa, अखेरचा मेसेज वडिलांना पाठवला; घरापासून दूर मुलाचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 19:08 IST

तेजसच्या बारावीच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. तो अभ्यासात फारसा हुशार नव्हता.

आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा इथे १२ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केली आहे. घरापासून ३ किमी अंतरावर एका इमारतीत त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. या मुलाने इमारतीवरून उडी मारली त्यात त्याचा जीव गेला. मृत्यूपूर्वी त्याने वडिलांना I Love You Papa असा मेसेज पाठवला. त्यानंतर काही तासांत मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा त्याच्या शिक्षणाला घेऊन खूप टेन्शनमध्ये होता. घरातून ट्यूशनला जाण्यासाठी तो निघाला. सिकंदरा येथील दहटोरा येथे राहणारा १७ वर्षीय तेजस हा १२वीत शिकत होता. सोमवारी कोचिंगला जात असल्याचे सांगून तो सायंकाळी सहा वाजता घरातून सायकल घेऊन निघाला होता. यानंतर काही वेळातच तेजसने त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर I Love You Papa असा मेसेज पाठवला. यानंतर वडिलांनी त्याच्या मोबाईलवर अनेकदा कॉल केला, मात्र त्याने त्यांच्या कॉलला उत्तर दिले नाही.

वडिलांनी नऊ वाजण्याच्या सुमारास सिकंदरा पोलीस ठाण्यात माहिती दिली. रात्री पोलिसांनी तेजसचा शोध सुरू केला. रात्री ११.३० च्या सुमारास तेजसचा मृतदेह आग्रा डेव्हलपमेंट अॅथॉरिटीच्या शास्त्रीपुरम हाइट्स इमारतीत आढळून आला. तेजसचा मृतदेह पाहून घरात एकच खळबळ उडाली. रडून रडून पालकांची अवस्था वाईट झाली आहे.

अभ्यासाचं टेन्शन होतंतेजसच्या बारावीच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. तो अभ्यासात फारसा हुशार नव्हता. त्याला आपल्या कुटुंबाची आणि शाळेची खूप काळजी वाटत होती. याबाबत त्याने वडिलांना अनेकदा सांगितले होते. मात्र त्याचा मानसिक ताण इतका वाढला की त्याने आपले जीवन संपवले.  

घरात पसरली शोककळावडील एका कारखान्यात खासगी नोकरी करतात. तेजस त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तेजसची सायकल शास्त्रीपुरम हाइट्सच्या इमारतीबाहेर सापडली. इमारतीच्या आत पाहिले असता तेजसचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या हात आणि पायाची हाडे मोडली. सिकंदरा स्टेशनचे प्रभारी निरीक्षक आनंद कुमार शाही यांनी सांगितले की, तेजसने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. परंतु पोलीस अद्याप तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी