कोलकातामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका ३३ वर्षीय तरुणाने आपल्याच आईची चाकुने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही घटना कोलकाता येथील राजरहाट वैदिक गावातील आहे.
या आरोपीने पोलिसांसमोर हत्या केल्याचे कबूल केले. चाकून हल्ला करुन हत्या केली, तसेच मृतदेहाजवळ रात्र बसून काढल्याचे त्याने सांगितले. या भयानक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्याचा सिगारेट ओढल्याचा व्हिडीओ घरी दाखविण्याची धमकी, ९ लाख ५९ हजाराचे सोने लुबाडले
गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या वादानंतर आरोपी सौमिक मजुमदारने त्याची ५८ वर्षीय आई देबजानी मजुमदार यांची चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. शुक्रवारी सौमिकने चहा विक्रेत्याकडे जाऊन "मी माझ्या आईला मारले आहे. मी रात्रभर काही खाल्ले नाही. काही खायला आहे का?" असं विचारले यावेळी ही हत्या उघडकीस आली.
मिळालेली माहिती अशी, चहा वाल्याजवळ हा आरोपी आला. यावेळी त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. यावेळी तो खूपच भयभीत झाला होता. चहावाल्याने लगेच पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा उघडताच जमिनीवर रक्ताचे डाग पडले होते. देबजानी मजुमदार यांच्या मानेवर आणि खांद्यावर अनेक चाकूने वार करण्यात आले होते. पोलिसांना रक्ताने माखलेली खुर्ची, डोक्याच्या मागच्या बाजूला खोल जखम आढळली.
गुरुवारी रात्री ११ ते मध्यरात्रीच्या दरम्यान ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सौमिकने त्याच्या आईजवळ शस्त्र ठेवून आणि स्वतःच्या जखमा पुसून हत्येचे नाटक आत्महत्या म्हणून करण्याचा प्रयत्न केला. परंतु सकाळी तो चहाच्या दुकानात गेला आणि धक्कादायक कबुली दिली. अटकेनंतर सौमिकने गुन्हा केल्याचे नाकारले.
मजुमदार कुटुंब मूळचे संतोषपूर येथे राहत होते. सौमिकचे वडील सौमेंद्र मजुमदार यांच्या निधनानंतर ते २०२१ च्या सुमारास वैदिक व्हिलेज अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. हा फ्लॅट त्याच्या वडिलांनी खरेदी केला होता. तेव्हापासून सौमिक त्याच्या आईसोबत राहत होता.