शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘माझ्यामुळे कुणाला त्रास नको’; आत्महत्या करतानाचा Video व्हायरल केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 09:59 IST

पिशोरची घटना : विष प्राशन करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच नातेवाइकांची धाव

पिशोर : ‘माझ्यामुळे कुणालाही तकलीफ नको,’ असे म्हणत विषारी औषध सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल करून तरुणाने जीवनयात्रा संपविली. ही घटना पिशोर येथे बुधवारी रात्री उघडकीस आली. सुनील दत्तू ढगे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाने नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुनील ढगे या तरुणाने समाजमाध्यमावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ टाकला. या व्हिडिओत सुनील म्हणाला की, ‘माझ्यामुळे कुणालाही तकलीफ होता कामा नये, मी औषध घेतोय. त्यामुळे भाऊ, भावजय यांना तकलीफ व्हायला नको.’ त्यानंतर दोन वेगवेगळ्या बॉटलमधून एका पारदर्शक ग्लासमध्ये विषारी औषध ओतून त्याने ते प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. व्हिडिओ व्हायरल होताच ओळखीच्या नागरिकांनी व नातेवाइकांनी तत्काळ अंजना-पळशी मध्यम प्रकल्पाच्या जवळील गट क्रमांक ५३० मध्ये जाऊन घटनास्थळ गाठले. अत्यावस्थेत पडलेल्या सुनीलला पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. प्रकृती गंभीर होत असल्याने प्रथमोपचार करून त्याला घाटी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. औरंगाबादकडे घेऊन जात सुनीलची प्रकृती अधिकच खालावत गेली. त्यामुळे नातेवाइकांनी फुलंब्रीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.-

गुरूवारी सकाळी झाले अंत्यसंस्कार

फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सकाळी पिशोरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सुनीलच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सपोनि. कोमल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार किरण गंडे पुढील तपास करीत आहेत.