शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आईवडिलांना कसे सांगू तेच कळत नाही!, संदेशच्या भावाला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 06:45 IST

बुधवारी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांच्या सुमारास बँकेचे कामकाज ग्राहकांसाठी बंद करण्याची वेळ असताना सफेद आणि काळा शर्ट घातलेले दोन जण तोंडावर लाल कपडा बांधलेल्या अवस्थेत त्याच्या साथीदारासह पिस्तूल घेऊन बँकेत शिरले. 

मुंबई: अवघ्या सात महिन्यांपूर्वी कंत्राटी तत्त्वावर नोकरीवर रुजू झालेल्या संदेशच्या नातेवाइकाना रडू आवरत नव्हते. आईवडिलांना आता कसे आणि काय सांगू? असा प्रश्न पडल्याने मोठ्या भावालाही दुःख आवरणे कठीण झाले होते.

आर. के. टी. मॅनपाॅवर अँड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गोमाने सात महिन्यापूर्वी रुजू झाला होता. त्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दहिसर शाखेत शिपाई म्हणून कंत्राटी तत्त्वावर ठेवले होते. ते तीन भाऊ असून विरारमध्ये मधल्या भावासोबत तो राहत होता. 

आई-वडील चिपळूणमध्ये असतात. ‘मला त्यांना आता काय सांगायचे तेच कळत नाही. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असेल,’ असे शताब्दी रुग्णालयाच्या शवागृहाजवळ भावाचा मृतदेह नेण्यासाठी आलेले मोठे भाऊ सचिन गोमाने सांगत असताना त्यांचे डोळे भरून आले. 

...आणि खेळ खल्लासबुधवारी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांच्या सुमारास बँकेचे कामकाज ग्राहकांसाठी बंद करण्याची वेळ असताना सफेद आणि काळा शर्ट घातलेले दोन जण तोंडावर लाल कपडा बांधलेल्या अवस्थेत त्याच्या साथीदारासह पिस्तूल घेऊन बँकेत शिरले. त्यांना बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या आणि विरारच्या मनवेलपाडा रोड येथील रहिवासी असलेल्या संदेश गोमारे (२५) याने पाहिले आणि सगळा प्रकार संशयित वाटल्याने तो उठून उभा राहिला. तेव्हा दुकलीपैकी एकाने त्याच्या छातीवर एक राऊंड फायर केला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. ते पाहून अवघ्या काही सेकंदांतच बँकेच्या कॅशिअरकडून अडीच लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन ३ वाजून २९ मिनिटांनी ते दोघेही पसार झाले. हा सगळा प्रकार अवघ्या अडीच मिनिटांत घडला.

गोळीबाराचा आवाज आला नाहीप्रत्यक्षदर्शी प्रवीण मकवाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बँकेच्या बाजूला असलेल्या गुरुकुल टॉवरजवळ बसले होते. त्यावेळी दोघांना आम्ही पळताना पाहिले. आधी काही समजले नाही. पण, नंतर गोळीबार झाल्याचे समजले. गोळीबाराचा आवाज आला नाही आणि एकाची हत्या झाल्याचे समजले.

मला चार वाजता संदेशच्या मित्राने फोन करीत बँकेतील गोळीबारात तो जखमी झाल्याचे सांगितले. तेव्हा मी शताब्दी रुग्णालयात धाव घेतली, ज्यात त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. तो आमचा सर्वांत धाकटा भाऊ होता. सोबत असलेले काका आणि अन्य नातेवाइकांनाही अश्रू अनावर झाले. संदेशच्या सहकाऱ्यांनीही त्या ठिकाणी गर्दी केल्याने वातावरण शोकाकुल झाले होते.

टॅग्स :SBIएसबीआयCrime Newsगुन्हेगारी