शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

'मला गर्लफ्रेंड नाही, तू शोधून दे, नाही तर तू बन'; अल्पवयीन मुलीकडे अजब मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 08:01 IST

पीडित मुलगी आणि तरुण पाटण तालुक्यातील एकाच गावात वास्तव्यास आहेत. त्यामुळे दोघांची तोंडओळख आहे. यातून संबंधित मुलाने सोशल मीडियावरून त्या मुलीकडे अजब मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: अलीकडे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले असून, अशाच एका छेडछाडीच्या प्रकाराने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत. 'मला गर्लफ्रेंड नाही, तू शोधून दे, नाही तर तू बन,' अशी अजब मागणी एका तरुणाने अल्पवयीन मुलीकडे केली आहे. या प्रकारानंतर भयभीत झालेल्या मुलीने ढेबेवाडी, ता. पाटण पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणाविरोधात तक्रार दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी आणि तरुण पाटण तालुक्यातील एकाच गावात वास्तव्यास आहेत.त्यामुळे दोघांची तोंडओळख आहे. यातून संबंधित मुलाने सोशल मीडियावरून त्या मुलीकडे अजब मागणी केली. 'मला गर्लफ्रेंड नाही, मला शोधून दे, नाही तर तू बन, तुझे काही डिटेल्स माझ्याकडे आहेत, तुझा फोन हॅक करायला सांगितला आहे,' अशी धमकी देऊन पीडित मुलीला त्याने ब्लॅकमेल केले.

या प्रकारानंतर भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर घरच्यांनी मुलीला घेऊन थेट ढेबेवाडी पोलिस ठाणे गाठले. मुलीच्या तक्रारीवरून संबंधित तरुणावर विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर