शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

"माझं तुझ्यावर प्रेम नाही"; तरुणाने परत मागितले खर्च केलेले पैसे, मुलीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 14:56 IST

मुलीने प्रेम नाकारल्यामुळे तरुणाने हे सर्व केलं.

लैला-मजनूपासून ते हीर-रांझापर्यंत प्रेमाच्या अनेक किस्से ऐकले असतील, पण एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने मुलीशी मैत्री केल्यानंतर, तिला घेऊन फिरण्यासाठी आणि चित्रपट दाखवण्यासाठी खर्च केलेले सर्व पैसे परत करण्याची मागणी केली आहे. मुलीने प्रेम नाकारल्यामुळे तरुणाने हे सर्व केलं.

कर्नाटकातील एका मुलीने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मैत्री करणाऱ्या मुलाकडून छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. कन्नड जिल्ह्यातील भटकल शहराजवळील हदावल्ली गावातील नेत्रा गोवाली असं मृत मुलीचं नाव आहे.

मुलीच्या वडिलांनी तिचा इन्स्टाग्राम मित्र गोवर्धन मोगर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीला एक वर्षापासून ओळखत होता आणि त्याने प्रेमासाठी तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. जेव्हा तिने त्याची ऑफर नाकारली तेव्हा त्याने तिच्यावर खर्च केलेले सर्व पैसे परत करण्यास सांगितले आणि त्रास देण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने तिला ब्लॅकमेल करून तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर झालेला छळ सहन न झाल्याने मुलीने बुधवारी हे टोकाचं पाऊल उचललं. भटकल ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी