शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

“मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही; पत्नी-मुलाचा विरह सहन न झाल्यानं युवकाचं जीवघेणं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 12:04 IST

तू माझी साथ सोडून गेलीस. आता जगायची इच्छा नाही. मी मरत आहे असं म्हणत पतीने गळफास घेतला.

ठळक मुद्देमी तुझ्यावर इतकं प्रेम नाही करत जितकं मी माझ्या मुलावर प्रेम करतो. तू चांगलं नाही केलं. तुला माहिती आहे मी मुलाशिवाय जगू शकत नाहीमाझ्या मृत्यूला नाजिया माझी पत्नी जबाबदार आहे. माझी सासू जबाबदार आहे

बहराइच – पत्नी आणि मुलाचा विरह सहन न झाल्यानं एका युवकाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. खोलीत पंख्याला लटकून त्याने जीव दिला. सुसाईड करण्यापूर्वी युवकाने पत्नीकडून होणारा मानसिक छळ मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. स्थानिकांकडून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस तिथे पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेतला.

बहराइच जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ३० वर्षीय इमरानने २५-२६ ऑक्टोबरच्या रात्री रुममध्ये पत्नीकडून झालेल्या मानसिक छळाबाबत धाय मोकलून रडत व्यथा मांडली. हा सर्व व्हिडीओ त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याच खोलीत पंख्याला लटकून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. मृत इमराननं व्हिडीओत म्हटलं की, नाजिया तु खूप चूक केली. मला माझ्या मुलापासून दुरावून सर्व नातं संपवून चुकीचं वागली. आज मी कुठेच राहिलो नाही. मी आईवडिलांची साथ सोडून तुझा हात पकडला होता असं त्याने सांगितले.

त्यानंतर तू माझी साथ सोडून गेलीस. आता जगायची इच्छा नाही. मी मरत आहे. शपथ, मी तुझ्यावर इतकं प्रेम नाही करत जितकं मी माझ्या मुलावर प्रेम करतो. मी जे काही केले माझ्या मुलासाठी केले. तू मुलाला घेऊन निघून गेली. मुलाला परत माझ्याकडे पाठवणार नाही हे मला माहिती आहे. तू चांगलं नाही केलं. तुला माहिती आहे मी मुलाशिवाय जगू शकत नाही. मी व्हिडीओ बनवतोय. माझ्या मृत्यूला नाजिया माझी पत्नी जबाबदार आहे. माझी सासू जबाबदार आहे. जी समजू शकली नाही की इमरान नाजिया आणि मुलाशिवाय राहू शकत नाही. मी गळफास घेतोय. त्याला जबाबदार नाजिया आहे असंही त्याने व्हिडीओत म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

निवृत्त दिवान महबूब आलम यांचा मुलगा इमरान बशीरगंज परिसरात पत्नी नाजिया आणि मुलासह राहत होता. मागील काही दिवसांपासून पती इमरान याच्याशी वाद घालत नाजिया माहेरी निघून गेली होती. परंतु इमरान याचं त्याच्या मुलावर खूप प्रेम होते. त्याने नाजियाच्या माहेरी जाऊन जबरदस्तीनं मुलाला घेऊन आला. ज्यामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. नाजिया मुलाला घेऊन माहेरी गेल्यानं इमरानला पत्नी-मुलाचा विरह सहन झाला नाही. त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत इमरानच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पुढील तपास सुरु आहे.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश