शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘मी सीबीआय डीआयजीचा पीए; प्रकरण मिटवतो, २० लाख द्या’, मेल करताच फुटले बिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 06:59 IST

सादिक कुरेशी असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. 

मुंबई : सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करत रेल्वेमध्ये कार्यरत एका वरिष्ठ इंजिनिअरकडून २० लाख रुपये उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला सीबीआयने अटक केली आहे. सादिक कुरेशी असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. 

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामध्ये वरिष्ठ मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या एका अधिकाऱ्याला कुरेशी याने तुमच्याविरोधात सीबीआयमध्ये काही तक्रारी प्राप्त झाल्या असून, मी सीबीआयमधील उपमहानिरीक्षकांचा स्वीय सहायक असून मदत करू शकतो, असे सांगितले. तसेच, उपमहानिरीक्षक म्हणून एका व्यक्तीशी   त्या इंजिनिअरचे बोलणे करून दिले. 

तक्रारीच्या पडताळणीनंतरकथित उपमहानिरीक्षकाने सादिक सर्व काही नीट करून देईल, त्याच्या संपर्कात राहा, असे सांगितले. यानंतर सादिकने संबंधित इंजिनिअरची भेट घेत प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम १३ लाख रुपये इतकी ठरली व त्याकरिता एक लाख रुपये टोकन देण्याचेही ठरले.  दरम्यानच्या काळात संबंधित इंजिनिअरने सीबीआयच्या कार्यालयाला पत्राद्वारे ही घटना कळवली व ही लाचखोरी आपल्याला करायची नसून, संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. सीबीआयने या तक्रारीची पडताळणी करत सादिकविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग