शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Hyderabad Encounter : पोलिसांनी उलगडला ३० मिनिटांचा एन्काउंटरचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 16:20 IST

आरोपींच्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे.

ठळक मुद्देया गोळीबारात २ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून पीडित डॉक्टर तरुणीचा फोन हस्तगत केला आहे. ४ आणि ५ डिसेंबरला आरोपींची चौकशी करण्यात आली होती.

हैदराबाद -हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे ५.३० वाजता  एन्काऊंटर करण्यात आला आहे. या आरोपींची नावे  मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशवुलु अशी होती. त्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. या प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री आरोपींना घटनास्थळी जिथे सामूहिक बलात्कार करण्यात आला तेथे नेले होते असल्याची माहिती सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांनी दिली.

त्यानंतर घटनास्थळी मध्यरात्री आरोपींनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदुका हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना बंदुका परत देण्यासाठी सांगितले. मात्र, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केलाच. त्यावेळी पोलिसांनी चार आरोपींवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात २ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मानव अधिकार आयोग अथवा अन्य सामाजिक संस्थेने याप्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास आम्ही उत्तर देण्यास तयार असल्याचे पोलीस आयुक्त सज्जनार यांनी सांगितले. ३० मिनिटं हा गोळीबार सुरु होता. आम्ही सायंटिफिक पद्धतीने या प्रकरणाची तपासणी करून चारही आरोपींना अटक केली होती.

४ आणि ५ डिसेंबरला आरोपींची चौकशी करण्यात आली होती. चारही आरोपींना घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर आरिफ आणि चिंताकुटा यांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. आरोपींनी दंडुके आणि दगडफेक करत पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोन आरोपींनी गोळ्या देखील झाडल्या. ही घटना सकाळी ५.४५ ते ६.१५ या दरम्यान घडली. आरोपींच्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे. यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवले जातील. आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गतही गुन्ह्याची नोंद झाली असल्याची माहिती सज्जनार यांनी दिली.

पीडित तरुणीचा फोन घटनास्थळाहून हस्तगतपोलिसांनी घटनास्थळाहून पीडित डॉक्टर तरुणीचा फोन हस्तगत केला आहे. मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशवुलु या चारही आरोपींना घटनाक्रम उलगडण्यासाठी घटनास्थळी घेऊन जाण्यात आले होते. घटनाक्रम जाणून घेणं हा पोलिसांचा उद्देश होता. जेणेकरून या प्रकरणाचा तपास करणं सोपं होईल. 

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिसRapeबलात्कारMurderखून