शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद बलात्कार; चौथ्या आरोपीला अटक; गुन्ह्यात सामील पाचही जणांची ओळख पटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 05:52 IST

Hyderabad rape case : आरोपींपैकी एक जण मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाच्या नेत्याचा मुलगा आहे.

हैदराबाद : एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चवथ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली असून, तो अल्पवयीन आहे. पाचही आरोपींची सीसीटीव्हीच्या फुटेजद्वारे ओळख पटविण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींपैकी एक जण मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाच्या नेत्याचा मुलगा आहे.

गेल्या २८ मे रोजी हैदराबाद येथे एका पार्टीहून घरी परतणाऱ्या १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. एका कारमध्ये हे अतिशय घृणास्पद कृत्य करण्यात आले. तुला घरी सोडतो, असे सांगून त्या मुलीला आरोपींनी आपल्या कारमध्ये बसविले. त्यानंतर, काही वेळाने तिला कारमध्ये मारहाण करण्यात आली व सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. 

बलात्काराची घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी गुन्हा नोंदविण्यात आला. इतक्या उशिरा का गुन्हा दाखल केला, याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय बाल हक्क रक्षण आयोगाने हैदराबाद पोलिसांकडे मागितले आहे. सामूहिक बलात्काराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजप व काँग्रेसने केली आहे. तेलंगणाचे राज्यपाल तामिलीसाई सुंदरराजन यांनी या प्रकरणाबद्दल राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांकडून दोन दिवसांत सविस्तर अहवाल मागविला आहे. (वृत्तसंस्था)

भाजप आमदाराने टाकली व्हिडीओ व छायाचित्रेअल्पवयीन मुलीवर ज्या कारमध्ये बलात्कार झाला, त्यावेळी एआयएमआयएमच्या एका आमदाराचा मुलगा तिथे उपस्थित होता, असा आरोप भाजपचे आमदार रघुनंदन राव यांनी करून, एक व्हिडीओ क्लिप व काही छायाचित्रे सोशल मीडियावर झळकावली आहे. त्यात दिसणारी व्यक्ती ही एआयएमआयएमच्या आमदाराचा मुलगा आहे, असा दावा रघुनंदन राव यांनी केला. त्या आमदाराचा मुलगा गुन्हा घडलेल्या ठिकाणी नव्हता, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा व्हिडीओ व छायाचित्रे भाजप आमदार रघुनंदन राव यांनी सोशल मीडियावर झळकवली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी