शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आठवतेय १५ वर्षांपूर्वीचे अक्कू यादव हत्याकांड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 22:13 IST

हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात चालला होता.

ठळक मुद्दे‘अक्कू यादव को छोड दो, हमे उसको खतम करना है’, असे हा जमाव म्हणत होता. या खटल्यात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर, आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर.के. तिवारी आणि अ‍ॅड. अशोक भांगडे यांनी काम पाहिले.

नरेश डोंगरे/ पूनम अपराज

नागपूर - संपूर्ण देशात खळबळ माजविणाऱ्या हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी एन्काउंटर करून ठार केले. ताबडतोब न्याय झाल्याची भावना यामुळे व्यक्त होत आहे. असेच एक प्रकरण १५ वर्षांपूर्वी नागपुरात घडले होते. तात्काळ शिक्षेची मागणीचा आग्रह धरून संतप्त जमावाने अक्कू यादव नामक गुंडाला चक्क न्यायालयातच ठार मारले होते.  देशभरातील लोकांच्या नजरा वेधणाऱ्या बहुचर्चित अक्कू यादव हत्याकांडाची आठवण  आता पुन्हा एकदा हैदराबाद एन्काऊंटर मुळे ताजी झाली आहे.

जमावाकडूनखात्मा१३ ऑगस्ट २००४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालय आवारातील ऐतिहासिक दगडी इमारतीमध्ये चालणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालय क्रमांक ७ मध्ये जरीपटका कस्तुरबानगर येथील कुख्यात गुंड भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव याचा संतप्त जमावाने चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती आणि काचेने भोसकून व दगडाने ठेचून खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर जमावाने अक्कूचे घर जाळून टाकले होते.

सामान्यांनाधरलेहोतेवेठीसकस्तुरबानगर आणि परिसराला आपल्या गुन्हेगारी कृत्याने वेठीस धरणारा अक्कू हा १९९१ पासून गुन्हेगारीत सक्रिय होता. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली, अशी २६ प्रकरणे त्याच्याविरुद्ध होती. १९९९ मध्ये त्याला झोपडपट्टी दादा व घातक व्यक्ती कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धही करण्यात आले होते. बलात्कार आणि छेडखानीची अनेक प्रकरणे त्याच्या दहशतीमुळे पोलिसांपर्यंत पोहोचतही नव्हती. तडीपार असतानाही तो कायदा मोडून गुंडागर्दी करायचा. गुंडगिरी करून दहशत माजवल्याने अक्कूला ७ आॅगस्ट २००४ रोजी अटक करून, दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते. परंतु त्याचा एक साथीदार बिपीन बालाघाटी हा अक्कूला जेवणाच्या डब्यात चाकू देताना पकडल्या गेल्याने त्याला पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्याला १० ऑगस्ट रोजी न्यायालयात आणण्यात आले होते. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली होती. याच दिवशी त्याचा खून करण्यासाठी जमाव आला होता. परंतु तत्कालीन पोलीस उपायुक्त यशस्वी यादव यांच्यामुळे घटना टळली होती.

आठवर्षेधूळखातहोतेप्रकरणतदर्थ न्यायालयाचे न्यायाधीश पी.एम. दुनेदार यांच्या न्यायालयात या खटल्यास प्रारंभ झाला होता. त्यांच्या न्यायालयात २२ ऑक्टोबर २०१२ रोजी पहिला साक्षीदार तपासण्यात आला. पुढे त्यांची बदली झाल्याने हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाकडे आला. त्यांच्या न्यायालयात अखेरचा साक्षीदार ३० सप्टेंबर २०१४ रोजी तपासण्यात आला. या खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. ७ डिसेंबर २००४ ते ऑक्टोबर २०१२ पर्यंत तब्बल आठ वर्षे हे प्रकरण धूळ खात पडून होते.

न्यायव्यवस्थेवरहल्लाआज अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर यांनी न्यायालयात आपला लिखित युक्तिवाद सादर केला. लोक ज्या न्यायालयात न्याय मागण्यास येतात त्याच पवित्र न्यायमंदिरात खून करण्यात आला. न्यायव्यवस्थेवर हा हल्ला होय. न्यायव्यवस्थेत भीती निर्माण झाली पाहिजे, असा आरोपींचा हेतू दिसत आहे. अशा स्थितीत आरोपींना सोडता येईल काय, आरोपींना सोडल्यास जनतेचा न्यायावरील विश्वास संपुष्टात येईल.आरोपींना साक्षीदारांनी पाहिले आहे. ओळख परेड आणि न्यायालयातही त्यांना ओळखले आहे. यावरून त्यांच्या साक्षीवर अविश्वास व्यक्त करता येणार नाही. न्यायालयाच्या तुटलेल्या दारातून आतमधील दिसते, त्यामुळे आतमधील दृश्य दिसत नाही, असे बचाव पक्षाचे म्हणणे योग्य नाही, असेही सरकार पक्षाने आपल्या युक्तिवादात नमूद केले. या खटल्यात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर, आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर.के. तिवारी आणि अ‍ॅड. अशोक भांगडे यांनी काम पाहिले.

हमेउसकोखतमकरनाहै’१३ ऑगस्ट रोजी अक्कू याला पोलीस कर्मचारी दामोदर चौधरी आणि रवींद्र सूर्यवंशी यांनी न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता २५-३० पुरुष आणि १०-१२ महिलांचा संतप्त जत्था त्याच्या दिशेने धावला होता. ‘अक्कू यादव को छोड दो, हमे उसको खतम करना है’, असे हा जमाव म्हणत होता. अक्कूला पोलिसांनी दगडी इमारतीच्या आत नेऊन चॅनल गेट बंद केले होते. त्याला न्यायालय क्रमांक ७ मध्ये नेण्यात आले होते. येथील न्यायाधीश अवकाशावर असल्याने त्याला दुसऱ्या न्यायालयात नेण्याची तयारी सुरू असतानाच जमावाने लाकडी दार तोडून न्यायालयात घुसून त्याचा खून केला होता.

केवळ१८आरोपीया प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भादंविच्या १२० (ब), १२१ (अ), १४३, १४७, १४८, ३४९, ३०२, ३५३, ३३२, ३२६, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. एकनाथ चव्हाण, उषा नारायणे, अ‍ॅड. विलास भांडे, अजय मोहोड, सुमेद करवाडे, दिलीप शेंडे, पंकज भगत यांच्यासह २१ जणांना अटक केली होती. त्यात सात महिलांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बबनराव पोराटे यांनी करून, न्यायालयात ७ डिसेंबर २००४ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात खटला सुरू असताना अजय मोहोड, देवांगणा हुमणे आणि अंजना बोरकर यांचे निधन झाले. नंतर या प्रकरणातील सर्वांना दोषमुक्त करण्यात आले होते. देश विदेशात हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते. हैदराबाद एन्काऊंटर मुळे विस्मृतीत गेलेले हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूरhyderabad caseहैदराबाद प्रकरणRapeबलात्कारCourtन्यायालय