हैदराबाद - हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी एन्काऊंटर केले. या घटनेचे वृत्त प्रसारमाध्यमांवर पाहून गंभीर दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सुमोटो याचिका दाखल करत पोलीस महासंचालक यांना विशेष पथकाला घटनास्थळाची पाहणी करुन चौकशी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.याप्रकरणी तपास विभागाच्या पोलीस उपमहासंचालकांच्या नेतृत्वाखील आयोगाने एक पथक तयार केले असून या पथकाला एन्काऊंटर झालेल्या घटनास्थळाला तात्काळ भेट देऊन या घटनेतील तथ्य तपासण्याचे आदेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. नुकतेच सायबराबादचे पोलीस आयुक्त वी.सी. सज्जनार यांनी पत्रकार परिषद घेऊन मानवाधिकार आयोग अथवा अन्य कोणत्याही सामाजिक संस्थेने या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केल्यास आम्ही उत्तर देण्यास तयार असल्याचं सज्जनार यांनी म्हटले आहे.
Hyderabad Encounter : घटनास्थळाला तातडीने भेट देऊन तथ्य तपासा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 17:04 IST
Hyderabad Case : चौकशी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Hyderabad Encounter : घटनास्थळाला तातडीने भेट देऊन तथ्य तपासा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दाखल
ठळक मुद्देयाप्रकरणी तपास विभागाच्या पोलीस उपमहासंचालकांच्या नेतृत्वाखील आयोगाने एक पथक तयार केलेघटनास्थळाला तात्काळ भेट देऊन या घटनेतील तथ्य तपासण्याचे आदेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले