उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नूरपूर पोलीस स्टेशन परिसरातील मधुसूदनपूर गावात एका महिलेने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली. गावातीलच एका युवकाशी त्या महिलेचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे आणि हत्येचा खुलासा केला आहे.रविवारी रात्री मधुसूदनपूर येथील रहिवासी सोमवीर याच्या डोक्यात जड वस्तूचा प्रहार करून हत्या करण्यात आली. पोलिस तपासात मृताची पत्नी सुनीताचे गावच्याच रॉकी नावाच्या युवकाशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी पोलिसांनी सुनीता आणि रॉकीला अटक केली आणि त्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान दोघांनीही सोमवीरची हत्या केल्याची कबुली दिली.प्रभारी निरीक्षक संजय पांचाळ यांनी सांगितले की, मृतक सोमवीर या दोघांच्या संबंधांना विरोध करीत होता. त्यामुळे दोघांनीही त्याला रस्त्यातून हटवण्याची त्याच्या हत्येचा कट आखला. रविवारी रात्री सुनीताने सोमवीरच्या अन्नामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. तो बेशुद्ध झाल्यानंतर तिचा प्रियकर रॉकीला बोलावण्यात आले आणि सुनीताने डोक्यात वीट मारून पतीची हत्या केली. यादरम्यान तिचा प्रियकर रॉकी तिथे उभा राहिला. सोमवीरचा मृत्यू झाल्यानंतर तो तेथून निघून गेला आणि सुनीताने तिच्या नवऱ्याला काही गुंडाने मारहाण केली म्हणून आरडाओरडा करून बनाव केला.
विवाहबाह्य संबंधात अडसर असलेल्या पतीचा पत्नीने काढला काटा, अन्नात टाकल्या झोपेच्या गोळ्या अन्...
By पूनम अपराज | Updated: October 27, 2020 21:27 IST
Murder : पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे आणि हत्येचा खुलासा केला आहे.
विवाहबाह्य संबंधात अडसर असलेल्या पतीचा पत्नीने काढला काटा, अन्नात टाकल्या झोपेच्या गोळ्या अन्...
ठळक मुद्देरविवारी रात्री मधुसूदनपूर येथील रहिवासी सोमवीर याच्या डोक्यात जड वस्तूचा प्रहार करून हत्या करण्यात आली.