शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

पती, पत्नी आणि थेलियम नायट्रेटचा प्याला; रहस्यमयी हत्येचे देशातील दुसरे प्रकरण, पण फुटलेच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 12:28 IST

थेलियम नायट्रेटचा वापर करून झालेल्या हत्यांचे भारतातील हे दुसरे उदाहरण आहे.

- रवींद्र राऊळ, वृत्तसंपादकविष पाजून हत्या करायची पण पोलिसांना त्याचा मागमूसही लागू द्यायचा नाही, या इराद्याने आजवर जगभरातील आरोपींनी वेगवेगळ्या विषांचा प्रयोग केला असेल  पण थेलियम आणि अर्सेनिक या विषारी रसायनांचा वापर करून सांताक्रु्झ येथील काजल शाह या विवाहितेने हितेश जैन या आपल्या प्रियकराच्या मदतीने अलीकडेच केलेली पती आणि सासूची हत्या हे भयंकर प्रकरणातील एक ठरावे. आरोपींनी कितीही प्रयत्न केले तरी तो आपल्याच चुकीने पोलिसांच्या जाळ्यात सापडतो, हा आजवरचा पोलिसांचा अनुभव आहे. 

थेलियम नायट्रेटचा वापर करून झालेल्या हत्यांचे भारतातील हे दुसरे उदाहरण आहे. दोन दशकांपूर्वी चंद्रकांत सहस्रबुद्धे या आरोपीने राजेंद्रसिंग अवल यांची हत्या करण्याच्या हेतूने त्यांना शीतपेयातून पाजलेल्या थेलियम नायट्रेटची पहिली घटना खळबळजनक ठरली होती. राजेंद्रसिंग अवल यांना भिसीची लाखो रुपयांची रक्कम परत देण्याचे टाळण्यासाठी त्यांना शीतपेयातून थेलियम नायट्रेट पाजल्याचा आरोप पोलिसांनी सहस्रबुद्धेवर ठेवला होता. देशात कुठेही उपलब्ध नसलेल्या थेलियम नायट्रेटचा प्रयोग राजेंद्रसिंग यांच्यावर झाल्याचे शोधून काढणे, हेच त्यावेळी  डॉक्टर आणि पोलिसांसमोर आव्हान होते. 

शीतपेयातून थेलियम नायट्रेट प्यायल्यानंतर राजेंद्रसिंग यांची अवस्था घरच्यांना बघवत नव्हती. त्यांच्या हातापायातले त्राण निघून गेले होते. अतिसाराने ते हैराण झाले होते. शरीरातील उष्णता प्रचंड वाढली होती. वातानुकूलित वॉर्डमधील पंखे अहोरात्र सुरू ठेवूनही त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा अखंड वाहत होत्या. दोन-तीन दिवसात त्यांचे डोक्यावरचे, दाढीचे केस गळू लागले. मानसिक संतुलन ढासळून ते असंबंद्ध बडबड करू लागले होते. वेगवेगळे भास होऊ लागले. आणखी काही दिवसात दोन्ही ओठ फुटले आणि त्यातून रक्त ठिबकू लागले होते. ही लक्षणे नेमकी कोणत्या आजाराची हे डॉक्टरांच्या टीमना कळत नव्हते. अखेर एका ज्येष्ठ डॉक्टरांनी अथक प्रयत्नाने जगातील सगळ्या विषांची लक्षणे शाेधून काढली तेव्हा त्यात थेलियमचे नाव पुढे आले. चौकशीअंती चंद्रकांतला पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याने राजेंद्रसिंगसह आणखी काही जणांवर थेलियम नायट्रेटचा प्रयोग केल्याचे आढळले. 

थेलियम नायट्रेटच्या वापराची कल्पना चंद्रकांतच्या डोक्यात कशी आली हेही तपासात उघड झाले. डिस्कव्हरी चॅनेलवर मेडिकल डिटेक्टीव्हज हा कार्यक्रम पाहत असताना त्यात परदेशातील एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्यासाठी थेलियम नायट्रेटचा वापर केल्याच्या गुन्ह्याची माहिती होती. तो कार्यक्रम पाहून प्रभावित झालेल्या चंद्रकांतने मित्राच्या मदतीने प्रिन्सेस स्ट्रीट येथील एका कंपनीमार्फत ते स्वित्झर्लंडवरून मागवले होते. मासे पाळलेल्या एका तलावातील किडे मारण्यासाठी हे थेलियम नायट्रेट हवे असल्याचे कारण त्याने पुढे केले होते. 

जगात अनेक देशात थेलियम नायट्रेटसारखी जहाल विषारी रसायने विकण्यावर बंदी आहे. पण डिस्कव्हरी चॅनेलवरील कार्यक्रम पाहून अनेक देशात त्याचे अनुकरण केले गेले असावे. काजल शाह आणि हितेश जैन यांनी थेलियम आणि अर्सेनिकचा प्रयोग करून डिस्कव्हरी चॅनेलवर दाखवलेल्या घटनेची पुनरावृत्ती केली. सासूची हत्या पचल्यानंतर काजल शाहने प्रियकराच्या मदतीने पती कमलकांत शाह यांना लक्ष्य केले. थेलियममुळे  कमलकांत यांचे अवयव एकामागोमाग एक निकामी होत गेले. त्यांच्या रक्ताच्या चाचणीत थेलियम आणि अर्सेनिकचे प्रमाण कमालीचे वाढल्याने डॉक्टरांना संशय आला. दोन्ही घटनांमध्ये डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे थेलियमचा वापर स्पष्ट झाला आणि आरोपी गजाआड पोहोचले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी