शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ताडवाडी येथे खून करून पसार झालेल्या नवऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 02:11 IST

कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे माहेरी राहत असलेल्या पत्नीने नवºयाला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पत्नीला ठार मारण्याची घटना घडली होती.

नेरळ : कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे माहेरी राहत असलेल्या पत्नीने नवºयाला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पत्नीला ठार मारण्याची घटना घडली होती. ५ मे रोजी दुपारी बायकोच्या डोक्यात कोयत्याने वार करून जंगलात पसार झालेल्या नवºयाला नेरळ पोलिसांनी अडीच दिवसांत जंगलातून पकडूनआणले.पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, सचिन सांगळे यांनी खून करून जंगलात पळून गेलेल्या योगेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार के ली. ही पथकेबोरगाव येथील जंगल पालथे घालत होती. योगेश हा पत्नीला ठार करून पळाल्याने तो आपल्या जीवाचे बरे-वाईट करील, अशी भीती पोलिसांना असल्याने नेरळ पोलिसांनी आपले खबरे सर्व ठिकाणी पाठवले होते. त्यानुसार ७ मे रोजी पोलिसांना खबऱ्यांकडून योगेश भला फोंडेवाडी येथे गावात येऊन जेऊन पुन्हा जंगलात गेला, अशी माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे नेरळ पोलीसठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ जाधव हे चिकणपाडा मार्गे तर पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी आणि सचिन सांगळे हे साळोख मार्गे फोंडेवाडी येथे खासगी वाहने घेऊन निघाले. सायंकाळी ६.३० च्या दरम्यान योगेशला जंगलात पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला रात्री नेरळ पोलीस ठाणे येथे आणून त्याची चौकशी सुरू केली. त्या चौकशीमध्ये योगश भला याने, तिने आपल्याला पैसे द्यावेत म्हणून कोयत्याने मारले, त्यात ठार मारण्याचा कोणताही हेतू नसल्याची कबुली दिली आहे.नेरळ पोलीसठाण्यात योगेश भला विरुद्ध गुन्हा नोंद असून त्याला ७ मे रोजी रात्री ८.३० वाजता पत्नी भीमा योगेश भला (३२) यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव या खून प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Arrestअटक