शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या महिलेसोबत अश्लिल चॅट करायचा पती; संतापलेल्या पत्नीने चार्जरनं जीव घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 11:59 IST

पोलिसांना पत्नीच्या हालचालीवर संशय येऊ लागल्याने त्यांनी तिला ताब्यात घेतले. या घटनेची कसून चौकशी केली असता पत्नीने गुन्हा कबुल केला.

फतेहपूर - आपल्या नजरेसमोरच पती दुसऱ्या महिलेसोबत अश्लिल चॅट आणि व्हिडिओ कॉल करत असल्याने पत्नीचा राग अनावर झाला. तिने चार्जर केबलनं पतीचा गळा आवळून खून केला आहे. राजस्थानच्या फतेहपूरमधील शेखावाटी इथं ही घटना घडली. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पत्नीला अटक केली असून तिने हत्येचा खुलासा केला. 

डीएसपी राजेश विद्यार्थीने सांगितले की, पती मकसूदचे परस्त्रीसोबत संबंध होते. तो पत्नीसमोरच तिच्याशी अश्लिल चॅट करत होता. ज्यामुळे पत्नी नाराज होती आणि तिने पतीची हत्या करण्याचा प्लॅन रचला. २ जुलै रोजी आरोपी महिला पती आणि सासूसोबत एका लग्न समारंभात गेली होती. समारंभातून पती घरी परतला आणि पत्नी १ तासानंतर घरी पोहचली. ज्यावेळी पत्नी घरी परतली तेव्हा पती मकसूद झोपलेला होता. तेव्हा संधीचा फायदा घेत सुरुवातीला ओढणीचा फास बनवला त्यानंतर मोबाईल चार्जरनं त्याला संपवलं. इतकेच नाही तर पतीने आत्महत्या केल्याचं भासवण्यासाठी पत्नीने त्याचा मृतदेह छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला. जेणेकरून ही आत्महत्या आहे असं पोलिसांची दिशाभूल करता येईल. 

पोलिसांना पत्नीच्या हालचालीवर संशय येऊ लागल्याने त्यांनी तिला ताब्यात घेतले. या घटनेची कसून चौकशी केली असता पत्नी मदिनाने पोलिसांना सांगितले की, मकसूद तिच्याशी रोज वाद घालत असे. मारहाण करून शारिरीक छळ करायचा. मदीनाने ओढणीने फास तयार करत कपाटात ठेवला. अनेक दिवसांपासून ती पतीचा काटा काढण्याचा प्लॅन आखत होती. पोलिसांनी हत्येत वापरण्यात आलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. पत्नीने हत्येची कबुली दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. 

आत्महत्येवर सासूला आला संशयमदिनाने मकसूदच्या हत्येनंतर त्याला आत्महत्या असल्याचं भासवलं. घरच्यांनी पोलिसांच्या भानगडीत पडण्याऐवजी अंत्यसंस्कार करून टाकले. परंतु सासूला संशय आल्यानंतर तिने सुनेला प्रश्न विचारले. तेव्हा ती घाबरली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तिने गुन्हा कबुल केला. पती मकसूद आणि पत्नी मदीना यांचा विवाह ६ वर्षापूर्वी झाला होता. या दोघांना अपत्य नव्हतं. त्यामुळे सातत्याने दोघांमध्ये वाद सुरू असायचे. गावातच मकसूद ज्वेलरी मेकिंगचं काम करत होता.