शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने घातला घाव अन्... 

By पूनम अपराज | Updated: November 3, 2020 17:17 IST

Murder : या घटनेनंतर कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तयारी करीत होते. दरम्यान कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी पती रवींद्र निषाद याला अटक केली.

ठळक मुद्दे सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी पतीने घरात ठेवलेल्या कुऱ्हाडीने तेतरीच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली.

गोरखपूरमधील चिलुआताल परिसरातील अमवा गावच्या दौलतपूर टोला येथे पतीने अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी तेतरी देवी (वय 35) हिचा कुऱ्हाडीने वार करून हत्या जीवे मारले. या घटनेनंतर कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तयारी करीत होते. दरम्यान कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी पती रवींद्र निषाद याला अटक केली.पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. दुसरीकडे, मुलगी म्हणते की, वडिलांची मानसिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे ते बर्‍याचदा रागावतात आणि हिंसक होतात. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र निषाद एक इलेक्ट्रिशियन आहे, तर पत्नी तेतरी देवी चौरस्त्यावर किराणा दुकान चालविते. यावरून दोघांमध्ये वाद व्हायचा. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी पतीने घरात ठेवलेल्या कुऱ्हाडीने तेतरीच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली.आई पडताना पाहून मुलांनी आरडाओरडा केला आणि आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचदरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह घरी आणला आणि कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. दरम्यान, या घटनेची माहिती कुणीतरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच एसएसपी जोगेंद्र कुमार आणि निरीक्षक चिलुआताल नीरज राय पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठविण्यात आला. तेतरीला चार मुली आणि एक मुलगा आहे. एसपी उत्तर अरविंद पांडे यांनी सांगितले की, नवऱ्याने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. पतीला अटक करुन कायदेशीर कारवाई केली जात आहे. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक