शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

थरार! भरबाजारात पतीनं पत्नीवर चाकूने केले सपासप वार; लोकांची पळापळ, क्षणार्धात बाजारपेठ बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 17:46 IST

खुनाचे कारण समजले नसले तरी पती-पत्नीत वाद होता. पती सतत संशय घेत होता

जळगाव : पाळधी, ता.धरणगाव येथे बाजारात आलेल्या पूजा सुनील पवार (वय २६) हिचा पतीने सुनील भिका पवार (वय ३४,रा.शिवाजी नगर, जळगाव) याने चाकूने सपासप सात वार करुन खून केला तर शालक  शंकर भिका चव्हाण (वय १८) याच्या छातीत चाकू खुपसून जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, खुनाचे कारण समजले नसले तरी पती-पत्नीत वाद होता. पती सतत संशय घेत होता, त्यामुळे पत्नी नांदायला जात नव्हती. फेब्रुवारी महिन्यापासून पूजा माहेरी पाळधी येथे होती. मंगळवारी देखील पाळधीत पती-पत्नीत वाद झाले होते. त्याची पाळधी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. हा खून करण्यासाठी सुनील याने बाजारातून चाकू घेतला. सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानातून वस्तू घेतल्यानंतर लगेच त्याने तिच्यावर वार केले. या घटनेमुळे पाळधीत पळापळ झाली होती. काही क्षणातच बाजारपेठ बंद झाली होती.

टॅग्स :Policeपोलिस