शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 16:57 IST

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने गावातील नितेश जाधव (३०) याच्याशी वाद घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कपोरज : चारित्र्याच्या संशयावरून दारुड्या पतीने पत्नीचा खून केला. ही घटना घटना शुक्रवारी रात्री १० वाजता नांद्री येथे  घडली. नांद्री येथील राजेंद्र रायभान बोदडे (३६) हा आपली पत्नी हर्षाबाई आणि तीन मुलांसोबत राहतो. घटनेच्या दिवशी तो पत्नी सोबतच शेतात गेला होता. मात्र, घरी परत येत असताना तो एकटाच परत आला. त्यामुळे गावातील नागरिकांना त्याच्यावर संशय आला.  दरम्यान रात्री उशीरापर्यंत आई परत न आल्याने त्याच्या मुलांनी आणि गावातील नागरिकांनी हर्षाबाईचा शनिवारी सकाळी शोध घेतला असता,  तिचा शोध घेतला असता. हर्षाबाई राजेंद्र बोदडे हिचा मृतदेह गावा शेजारील एका नाल्यात आढळून आला. दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने गावातील नितेश जाधव (३०) याच्याशी वाद घातला. त्यालाही कुºहाडीने मारून जखमी केले. त्यामुळे नितेशला सामान्य रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. उपचारानंतर नितेशला सुटी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे नांद्री गावात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने गावातील एकाशी वाद घातला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच  खामगावचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी भेट दिली.  (वार्ताहर)

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीMurderखून